• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सप्रे स्मृती खुल्या बुद्धीबळ स्पर्धा रत्नागिरीत

by Guhagar News
February 1, 2024
in Old News
32 0
2
Sapre Smriti Open Chess Tournament in Ratnagiri
63
SHARES
180
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लाखाची बक्षिसे : केजीएन सरस्वती फाऊंडेशनतर्फे ३ पासून आयोजन

रत्नागिरी, ता. 01 : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते, मुळचे देवरुखचे (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केजीएन सरस्वती फाऊंडेशन यांनी सप्रे स्मृती जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा येत्या ३ व ४ फेब्रुवारी रोजी होणार असून स्पर्धेला चेसमेन रत्नागिरी तांत्रिक सहकार्य करणार आहे. Sapre Smriti Open Chess Tournament in Ratnagiri

शेरे नाका येथील रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात ३ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता स्पर्धेला सुरवात होईल. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत एक लाख रुपयांची बक्षिसे, आकर्षक चषक आणि पदक स्वरूपात देण्यात येणार आहेत. कै. सप्रे भारतात १९५५ साली झालेल्या पहिल्या वहिल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते होते. याचसोबत त्यांनी १९५६ आणि १९६० साली झालेल्या जागतिक ऑलिंपियाड स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेले सप्रे उत्कृष्ठ बुद्धीबळ विश्लेषक म्हणून ओळखले जात. सत्तरच्या दशकात त्यांनी ५ राष्ट्रीय निवड स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून काम केले. बहुतांश सर्व मुख्य स्पर्धांवर स्तंभलेखन देखील करत. Sapre Smriti Open Chess Tournament in Ratnagiri

सप्रे यांच्या या कार्याची दखल घेत चेसमेन आणि केजीएन सरस्वती फाउंडेशन सप्रे स्मृती स्पर्धा २०१३ पासून आयोजित करत आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. कोरोन काळात या स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. यंदा जलद व अतिजलद स्पर्धेत बक्षिसांची रेलचेल आहे. मुख्य बक्षिसांसोबतच १५, १३, ११, ०९, ०७ वर्षाखालील गट तसेच ज्येष्ठ नागरिक गट, उत्कृष्ठ दिव्यांग खेळाडू अशा विविध प्रकारात खेळाडूंना प्रोत्साहनपर चषक, रोख रक्कम आणि पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. Sapre Smriti Open Chess Tournament in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSapre Smriti Open Chess Tournament in RatnagiriUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share25SendTweet16
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.