गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय, कोतळूक येथे मराठी शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Sanvi 2nd in handwriting competition

या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात इयत्ता सातवीतील सान्वी संकेत गोयथळे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. माध्यमिक गटात मधुरा संतोष पावसकर तृतीय तर उच्च माध्यमिक गटात भाग्यश्री चंद्रकांत गुरव हिने द्वितीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका कांबळे व ज्योती माने यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश भोसले मुख्याध्यापक शिवाजी आडेकर उप मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी अभिनंदन केले. Sanvi 2nd in handwriting competition

