संतोष जैतापकर, पोलीसांच्या चौकशीला केव्हाही तयार
गुहागर, ता. 04 : स्वार्थी राजकारण आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले आहे. त्या तिघांशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. तरीही पोलीसांनी चौकशीला बोलावले तर केव्हाही जायला तयार आहे. असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्या ओबिसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी पत्रकार परिषदेत केले. Santosh Jaitapkar held a press conference
वेळणेश्र्वरच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्या घरावर पाळत ठेवण्याच्या प्रकरणात संतोष जैतापकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांची पोलीस चौकशी करा. अशी मागणी आमदार जाधव यांनी पोलीस ठाण्यात केली. तसेच जाहीर सभेत भाजप पदाधिकारी महिला सदस्यांच्या घरावर पाळत ठेवतात. असा उल्लेखही त्यांनी केला. यासंदर्भात संतोष जैतापकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संतोष जैतापकर म्हणाले की, ओबीसी समन्वय समितीमध्ये नेत्राताई आणि मी सल्लागार म्हणून एकत्र काम करतो. त्यांचा माझ्यावर संशय होता तर त्यांनी थेट मला विचारायला हवे होते. जर हे तिघे घरावर पाळत ठेवण्यासाठी, रेकी करण्यासाठी आले असते तर त्यांनी स्वत:ची खरी ओळख उघड केली असती का. एवढा साधा विचार करायला हवा होता. आज गुहागर तालुक्यात पर्यटन व्यवसाय वाढतोय. वेळणेश्र्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. ठाकुर कुटुंब पर्यटन व्यवसायात आहेत. या पार्श्र्वभुमीवर तीन पर्यटकांना कोणतीही खातरजमा न करता पोलीस ठाण्यात नेल्याने पर्यटक व्यवसायावर परीणाम होईल. याचा विचार करायला हवा होता. Santosh Jaitapkar held a press conference


परंतु दुर्दैवाने स्वार्थी राजकारणासाठी आणि प्रसिध्दीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले आहे. सामान्य पर्यटकांचा बळी दिला आहे. माझ्याकडे असंख्य लोक येतात. या तीन व्यक्ती कोण आहेत त्याबद्दल मला पुसटशी कल्पनासुध्दा नाही. माझी बदनामी करुन राजकीय अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत वकिलांशी सल्लामसलत करुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. Santosh Jaitapkar held a press conference
आम्ही करत असलेली कामे जनतेला समजत आहेत. गेल्या दोन वर्षात 2200 हुन अधिक लोकांना त्यांचा पक्ष न पहाता आम्ही वैद्यकिय मदत केली आहे. परंतु यांच्या पायाखालची वाळु सरकु लागली आहे. म्हणून असले घाणेरडे आरोप करुन सहानुभुती मिळवायचा हा प्रयत्न आहे. रेकी करणे, पाळत ठेवणे ही गुहागरची राजकीय संस्कृती नाही. यापुढे असले असभ्य राजकारण भाजपचे कार्यकर्ते सहन करणार नाही. Santosh Jaitapkar held a press conference