• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा

by Manoj Bavdhankar
July 25, 2024
in Guhagar
134 1
0
Sant Shiromani Namdev Maharaj Samadhi Ceremony
263
SHARES
750
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

02 ऑगस्ट रोजी श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान परशुराम सभागृह

गुहागर, ता. 25 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार दिनांक 02  ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Sant Shiromani Namdev Maharaj Samadhi Ceremony

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई श्री. हेमंत अनंत बावधनकर, माजी केंद्र प्रमुख शिक्षण विभाग गुहागर, श्री, श्रीकांत हरिश्चंद्र वेल्हाळ, श्री देव व्याडेश्वर देवस्थान अध्यक्ष शार्दुल सुधन्वा भावे हे उपस्थित राहणार आहेत. Sant Shiromani Namdev Maharaj Samadhi Ceremony

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सकाळी 8 ते 10 वा. श्री संत नामदेव महाराजांची पूजा व श्री सत्यनारायणाची पूजा, सकाळी 10 ते 11 वा. गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सकाळी 11 ते 12.30 वा. ह.भ. प. सौ. मनाली मनोज बावधनकर यांची किर्तन सेवा, दुपारी ३ ते 4 वा. महीलांसाठी विविध खेळ, सायंकाळी ५  ते 6.30 वा. स्वरसंध्या भक्तीगीतांचा कार्यक्रम व हळदी कुंकू समारंभ हे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने करण्यात आले आहे. Sant Shiromani Namdev Maharaj Samadhi Ceremony

Sant Shiromani Namdev Maharaj Samadhi Ceremony

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSant Shiromani Namdev Maharaj Samadhi CeremonyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share105SendTweet66
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.