शिंपी समाज मंडळ गुहागर तर्फे आयोजन
गुहागर, ता. 26 : गुहागरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा करण्यात येणार आहे. हा सोहळा मंगळवार दि. २६ जुलै २०२२ रोजी श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या पर्शुराम सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थितीत रहावे, असे अवाहन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाज मंडळातर्फे करण्यात येत आहे. Sant Namdev Maharaj Utsav

हा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून गुहागर तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, प्रमुख उपस्थिती श्रीम. सुचिता सुशिल वेल्हाळ(माजी सभापती, पंचायत समिती गुहागर) (उपाध्यक्षा, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी), मा. श्री. शार्दुल भावे, अध्यक्ष, श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड गुहागर या सर्वांचे उपस्थितीत होणार आहे. Sant Namdev Maharaj Utsav

या उत्सव सोहळ्यानिमित्ताने श्री संत नामदेव महाराजांची पूजाश्री सत्यनारायणाची पूजा, गौरव सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी विविध खेळ, जांभळादेवी प्रासादिक भजन मंडळ, बाग-गुहागर यांचे भजन व महिलांसाठी हळदीकुंकू असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थितीत रहावे, असे आवाहन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाज मंडळाचे वतीने करण्यात येत आहे. Sant Namdev Maharaj Utsav
