सौ. मेधा पाटणकर; गुहागर हायस्कूलमध्ये संस्कृत दिन
गुहागर, ता.17 : संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा असून तिच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी संस्कृत दिन सर्वत्र साजरा केला जातो. डॉ. आंबेडकरांनी संस्कृत भाषा राष्ट्रभाषा व्हावी, म्हणून प्रयत्न केले होते, असे विचार सौ. मेधा पाटणकर यांनी व्यक्त केले. श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्कृत दिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. आपले ध्येय निश्चित करा व त्यासाठी जिद्द व प्रयत्न ठेवा असेही आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. Sanskrit is an ancient language

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजनाने झाली. यावेळी कु. चारुता आठवले, मनस्वी जाधव, वेदिका काजारे, प्रियल बेंडल, दिप्ती घाडी, आदर्शा घाडगे, श्रीया जावळे, जान्हवी घाडे या विद्यार्थ्यीनींनी ईशस्तवन सादर केले. सौ. ठाकूर मॅडम यांनी पाहुण्यांचा परिच करुन दिला. सौ. देवकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. Sanskrit is an ancient language

संस्कृत दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी काही कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये संस्कृत भाषा – वैज्ञानिक भाषा ही संस्कृत नाटीका 9 वी ब मधील विद्यार्थीं समृद्ध पडवळ, सक्षम डोणेकर, तन्मय ओक यांनी सादर केली. तर 10 वी ब मधील प्रज्ञा घाणेकर, वेदश्री धनावडे, धनश्री कळझुणकर, श्वेता कदम, कैवल्य खरे आणि पिनाक साखरकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले. भाग्यश्री नाटेकर, सोनल महाजन, श्वेता पवार, रिया घुमे, नंदिनी जोशी, पूर्वी लाकडे यांनी देशभक्तीपर संस्कृत गीत सादर केले. यश शिर्के याने समस्यापुर्ती या प्रकारातील एक सुभाषित सांगितले. तर ओम देवकर याने संस्कृत कथा सादर केली. Sanskrit is an ancient language

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आडेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुग्धा गमरे व समृद्धी मोहिते यांनी केले. तर आभार प्रदर्शन चारुता आठवले हिने केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आडेकर सर, उप मुख्याध्यापक श्री. कांबळे सर, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. Sanskrit is an ancient language

