गुहागर, ता. 03 : श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व व स.सु.पाटील शास्त्र, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर मध्ये संस्कृत दिन संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. संस्कृत दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी काही कार्यक्रम सादर केले. यामध्ये स्वागतगीत, संस्कृत सुभाषित, संस्कृत कथा, संस्कृत बालगीत, संस्कृत गीत, कालभैरवाष्टक स्तोत्र सादर केले. यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत प्रदर्शनीचे आयोजन केले होते. Sanskrit Day Celebration in Guhagar High School
‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाणभारती ‘अशी महती असलेल्या संस्कृत भाषेचा गौरव करण्यासाठी तसेच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दरवर्षी संस्कृत दिन साजरा केला जातो. शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मयुरेश पाटणकर सर उपस्थित होते. संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा असून आजही स्तोत्र, आरत्यांच्या माध्यमातून ती घराघरात बोलली जाते. जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवरचा उपाय आपल्याला भगवद्गीतेत मिळतो म्हणून केवळ शालेय अभ्यासातील एक विषय म्हणून न शिकता संस्कृत भाषेवर प्रेम करा. असे विचार त्यांनी यावेळी मांडले. Sanskrit Day Celebration in Guhagar High School
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.एस. कांबळे सर , पर्यवेक्षिका सौ.कांबळे मँडम, पर्यवेक्षक श्री. गंगावणे सर, सौ.भोसले मँडम, सौ. बाणे मँडम, सौ.ठाकूर मँडम, सौ.देवकर मँडम आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.चारुता आठवले व कु.सोनल महाजन यांनी केले तर आभार कु.वेदिका काजारे हीने मानले. Sanskrit Day Celebration in Guhagar High School