बौद्ध, जैन परंपरेतही संस्कृत साहित्य; प्रा. प्रणाली वायंगणकर
रत्नागिरी, ता.17 : भारतीय प्राचीन संस्कृत साहित्य हे हिमनगासारखे आहे. वैदिक साहित्याचा अभ्यास व महाकाव्ये यांचा जास्त अभ्यास केला जातो. परंतु त्याहीपुढे जाऊन बौद्ध, जैन परंपरेतील संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. मीसुद्धा रत्नागिरीत संस्कृत शिकले. परंतु संशोधनात्मक कार्यासाठी बाहेरील संस्थांमध्ये सहभाग घेतल्यामुळे ही माहिती मिळाली. संस्कृत संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे, त्या संधीचे सोने करा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली-संस्कृत विभागातील प्रा. प्रणाली वायंगणकर यांनी केले. Sanskrit Day at Gogte-Joglekar College


संस्कृत दिन कार्यक्रमात बोलताना प्रा. प्रणाली वायंगणकर
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (Gogte-Joglekar College) संस्कृत विभागातर्फे आयोजित संस्कृत दिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. सुरवातीला प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी प्रा. वायंगणकर यांचा सत्कार केला. संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रणाली वायंगणकर या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व संस्कृत विभागात काही काळ अध्यापनही केले. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठ व गेली ११ वर्षे पुणे विद्यापीठात पाली-संस्कृत विभागात संशोधनाचे कार्य करतात. Sanskrit Day at Gogte-Joglekar College


प्रणाली वायंगणकर म्हणाल्या की, रत्नागिरीच्या मर्यातील अवकाशात काम करताना बाहेरील संशोधनाच्या जगातही डोकावा. बौद्ध साहित्य पाली, गांधारी प्राकृत, अभिजात संस्कृत व बौद्ध संकर संस्कृत भाषा यामध्ये आहे. गांधारी प्राकृतचे अभ्यास करणाऱ्या व्यक्ती भारतात नाहीत. असंख्य तुकडे जोडून पाश्चात्य विद्वान काम करत आहेत. वायव्य भारतात गांधार देशात गांधारी प्राकृतचे ग्रंथ निर्माण झाले. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत यावर मोठे संशोधन सुरू आहे. अभिजात संस्कृत म्हणजे पाणिनीला प्रमाण मानून झालेले साहित्य. बौद्ध संस्कृत साहित्यातही अभिजात संस्कृत पाहायला मिळते. अश्वघोष हा संस्कृततज्ज्ञ कवी होता. त्याने काव्ये लिहिली. बुद्धांचे समग्र चरित्र लिहिले. अश्वघोषला वाल्मिकी व व्यास यांना नितांत आदर होता. Sanskrit Day at Gogte-Joglekar College
संस्कृत पारंपरिक संस्कृत संशोधन करण्याकडे कल असला, तरीही बौद्ध संस्कृत साहित्याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. या निमित्ताने संशोधनाची नवी शाखा आपल्याला खुली आहे. विद्यार्थ्यांनी फक्त रत्नागिरीतच राहू नये. तर संस्कृतसाठी विविध ठिकाणी संशोधनाकरिता भेट द्यावी, अशी सूचना केली. शिष्यलेख आदींचा संदर्भ देत बौद्ध संस्कृत साहित्याचा गाढा अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. Sanskrit Day at Gogte-Joglekar College


प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी प्रणाली वायंगणकर यांचे कौतुक करून संस्कृत संशोधन क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे नवनवीन उपक्रम, कार्यक्रम सुरू आहेत. या नव्या क्षेत्रातील संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले. Sanskrit Day at Gogte-Joglekar College