कोकणातील शिमगोत्सवातील नमन, खेळ्यांमधील संकासुर हे पात्र लोकप्रिय आहे. या संकासुराचे पूजन केले जाते. खेळ्यात संकासुरासोबत राधा नाचते. काही ठिकाणी नटवा असतो. याची अधिक माहिती देणारा ‘संकासूर : कोकणातील एक लोककला’ हा लघुपट आहे. आपल्याला हा लघुपट नक्कीच आवडेल. त्यातून संकासूराविषयी अधिक माहिती मिळेल. अनेक संदर्भ, विविध ठिकाणच्या नमनाच्या पध्दती यातून हा लघुपट बनला आहे.
Sankasur – A Folk Art From Konkan (संकासूर – कोकणातील एक लोककला) Award Winning Documentary This is a Marathi Documentary Film based on the Traditional Folk Art form of Konkan. This Folk form is a very well known and preserved traditional form, but is limited to Konkan. It is a part of ‘Shimgotsava’ or ‘Holi’ festival, which comes in the month of March. The laborious locals of Konkan, have played a major role in preserving this art form for many decades. Newer generations are also attracted towards it and are trying their best to learn and present this art form. The costumes, songs, dances are unique in themselves. Not just entertainment, but it also serves as a main source of income for the laborious locals in non farming days. This art form has a mythological as well as devotional background. It is very close to the hearts of people of Konkan. Producer : Dhananjay Vasant Mehendale (Mehendale Motion Pictures Presents) Concept : Dr. Meenal Mehendale Director : Dhananjay Vasant Mehendale Research : Dhananjay Vasant Mehendale Script : Dr. Aarya Joshi & Dhananjay Vasant Mehendale Camera : Shreyas Shashikant Joshi & Dhananjay Vasant Mehendale Editor : Onkar Chandrakant Pradhan Narration : Ravindra Khare
कोकण, निसर्गसंपन्नतेबरोबरच सण उत्सवांनी नटलेली भूमी. गौरी-गणपती, होळी या उत्सवांसाठी बाहेरगावी असलेले बरेचसे चाकरमानी सुट्ट्या काढून आवर्जून गावी येतात. कोकणातल्या या विविध सणांमध्ये महत्वाचा असलेला सण म्हणजे शिमगा. अर्थात होळी... फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळी पौर्णिमेपर्यंत साधारणपणे दहा दिवस चालणारा हा सण. फाक पंचमीला गावातील मंदिरात पहिली होळी पेटते. त्यानंतर होळी पौर्णिमेपर्यंत गावात दररोज विविध ठिकाणी होलिका पूजन होतं. कोकणात शिमग्यामध्ये नमन, गण, गवळण, उत्सवात पालखी नाचवणे या सारखे अनेक पारंपरिक खेळ सादर केले जातात. यापैकीच एक असतो – संकासूर... विविध गावचे संकासूर मंडळी आजूबाजूच्या गावांमध्ये घरोघरी आपली कला सादर करत घरोघरी फिरत असतात. यांना नमन मंडळ असं देखील म्हटलं जातं. डोक्यावर शंकुकृती काळी टोपी, मोठी पांढरी दाढी लावलेले, संपूर्ण काळे कपडे, आणि कंबरेला घुंगरांचा जवळपास पंधरा किलोचा पट्टा बांधलेले संकासूर कोकणातल्या उन्हाळ्यात अनवाणी आपली कला दाखवत फिरतात. त्यांच्या सोबत अवजड मृदुंग घेतलेले मृदुंग वादक, स्त्री वेषातील पुरूषाचं राधा नावाचं पात्र आणि अन्य सह कलाकार असं या नमन मंडळाचं स्वरूप... कोकणातील प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला कष्टकरी समाज संकासुराचे खेळ सादर करतो. शिमग्याच्या काळात शेतीची बरीचशी कामं संपल्यावर, या समाजातील काही लोक उपजीविकेसाठी गावोगावी आपली संकासुराची पारंपरिक कला सादर करत फिरतात. त्यातून मिळालेल्या शिधा- दक्षिणा या स्वरूपातील उत्पन्नातून आपली गुजराण करतात. गुहागर, दापोली, दाभोळ, असगोली, पालशेत, पालपेणे, निवोशी, वेळंब, वरवेलीमधील रांजाणेवाडी व शिंदेवाडी वगैरे विविध गावांमध्ये ही कला आजही जोपासलेली दिसून येते. संकासुराचा आणखी एक प्रकार, म्हणजे 'काठ्खेळ' - यामध्ये मुख्य पात्र हे संकासूरच असतं. त्याचा पोशाखही सर्वसाधारण संकासुराप्रमाणेच असतो. सोबत दोन पखवाजवादक, झांजवादक आणि इतर सहकारीही असतात; परंतु याशिवाय त्यांच्यासोबत डोक्याला पागोटं, अंगात लांब बाह्यांचा अंगरखा आणि हातात लाकडी टिपऱ्या घेतलेले काही सहकारी असतात. लाकडी टिपऱ्या घेऊन गुजराती समाजाच्या दांडियासारखे फेर धरून ते नाचतात, म्हणून हे काठ्खेळ. असगोली, अडूर या ठिकाणचे काठ्खेळ पाहण्यासारखे असतात. या सर्वांखेरीज आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे 'नकटा किंवा नटवा'... यात 'नकटा किंवा नटवा' हे मुख्य पात्र असतं. नकटा साकारणाऱ्या व्यक्तीने चेहऱ्यावर लाकडी मुखवटा लावलेला असतो. निवोशी, दाभोळ येथील नकटे प्रसिद्ध आहेत. जवळपास अडीच वर्षांपासून 'संकासूर' या विषयावर आम्ही (मेहेंदळे मोशन पिक्चर्स) काम करत होतो. संकासूर या विषयावर बरंच संशोधन करावं लागल्याने, माहितीपट पूर्ण होण्यास विलंब झाला. पण कोकणातील ही काहीशी अप्रसिद्ध कला जगासमोर यावी हाच आमचा या माहितीपटाच्या निर्मितीमागचा उद्देश.
माहितीपटाची संकल्पना : डॉ. मीनल मेहेंदळे
संशोधन आणि दिग्दर्शन : धनंजय वसंत मेहेंदळे
लेखन : डॉ. आर्या जोशी आणि धनंजय वसंत मेहेंदळे
छायाचित्रण : श्रेयस शशिकांत जोशी आणि धनंजय वसंत मेहेंदळे
संकलन : ओंकार चंद्रकांत प्रधान
निवेदन : रवींद्र खरे
निर्मिती : धनंजय वसंत मेहेंदळे (मेहेंदळे मोशन पिक्चर्स)