• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संगमेश्वर तेली समाज नवीन तालुका कार्यकारिणी निवड

by Ganesh Dhanawade
April 29, 2025
in Ratnagiri
98 1
0
Sangameshwar Teli Samaj new Executive
193
SHARES
552
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अध्यक्षपदी संतोष रामचंद्र रहाटे यांची एकमताने निवड

रत्नागिरी, ता. 29 : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ उपशाखा संगमेश्वर तालुका तेली समाज सेवा संघ तालुका संगमेश्वरची  नवीन तालुका कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठक चिंतामणी मंगल कार्यालय, देवरुख येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संगमेश्वर तालुक्यातील तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sangameshwar Teli Samaj new Executive

जिल्हा संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर, जिल्हा संघटक मनोहर रहाटे, अंतर्गत हिशेब तपासनीस अनंत भडकमकर, जिल्हा सेवा आघाडी अध्यक्ष काशिनाथ सकपाळ, म.प्रां.तै.महासभा कोकण विभाग महिला अध्यक्षा प्रियंका भोपळकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सचिव हरिश्चंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. तर तालुका अध्यक्ष संतोष पावसकर यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सामाजिक बांधिलकी व संघटना या विषयावर संदिप पवार, बबनशेठ किर्वे, दिनेश नाचणकर, रघुविर शेलार, यांनी मौलिक मार्गदर्शन केले. सभागृहातून भाई लांजेकर,मनोहर रहाटे,अविनाश आंब्रे, दिलीपशेठ रहाटे, राजाराम विभुते, इत्यादींनी चर्चेत सहभागी होऊन वातावरण निर्मिती केली. Sangameshwar Teli Samaj new Executive

यावेळी संगमेश्वर तालुका नुतन अध्यक्ष म्हणून संतोष रामचंद्र रहाटे यांची उपस्थित सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून भाई लांजेकर, महादेव रहाटे, दिपक सकपाळ, सचिवपदी योगेश चव्हाण, खजिनदार सदाशिव रहाटे, सल्लागार बबन किर्वे, संदिप पवार यांच्यासह अन्य सदस्य घेऊन बेसिक कार्यकारिणी निवड करण्यात आली. तसेच तालुका महिला अध्यक्षा म्हणून दिपीका किर्वे यांच्यासह नवीन व जुन्या महिला भगिनींना सहभागी करून महिला कार्यकारणी तर तालुका युवक अध्यक्ष म्हणून प्रविण महादेव रहाटे यांच्यासह नवीन दमाच्या दमदार युवकांना सहभागी करून घेत  युवक कार्यकारणीची निवड करण्यात आली. या सर्व बेसिक, महिला, युवक कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. Sangameshwar Teli Samaj new Executive

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSangameshwar Teli Samaj new ExecutiveUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share77SendTweet48
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.