ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुणगौरव
गुहागर, ता. 25 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीतर्फे विविध स्पर्धा संपन्न झाल्या. “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त” उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीरांचा या उपक्रमांतर्गत घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील प्राथमिक गट हस्ताक्षर स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेतील (New English School and Junior College, Patpanhale) विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. Samriddhi second in handwriting competition

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग रविंद्र चव्हाण, मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. Samriddhi second in handwriting competition
कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने प्राथमिक गटातील हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून सुयश संपादन केल्याबद्दल ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुस्तकरुपी भेट व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण, मुख्याध्यापक एम.ए. थरकार , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Samriddhi second in handwriting competition
