• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचा पालशेत येथे शुभारंभ

by Manoj Bavdhankar
June 3, 2025
in Guhagar
115 1
1
Samarth Bhandari Urban Credit Institution launched at Palshet
226
SHARES
647
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था ही नेहमीच पारदर्शकता व विश्वासार्हता या तत्त्वानुसार चालणारी असून नेहमीच ग्राहकांचा हित जपत काम करत असल्याचे मत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी व्यक्त केले. श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण याची गुहागर तालुक्यातील पालशेत शाखा क्रमांक १९ व्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. Samarth Bhandari Urban Credit Institution launched at Palshet

Regal College Shringaratali Admissions Start

यावेळी प्रभाकर आरेकर यांच्या हस्ते फित व चिपळूण अर्बन बँकेचे संचालक प्रशांत शिरगावकर यांचे  हस्ते श्रीफळ वाढवून  उद्घाटन कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रभाकर आरेकर म्हणाले की, या संस्थेत येणारा प्रत्येक ग्राहक आपला  मानून व तो कधी नाराज होणार नाही याची दक्षता घेतली जाते. ठेविदारानी आपली गुंतवणूक करताना डोळसपणे व संस्थांचे आर्थिक स्थिती पाहून करणे आवश्यक असल्याचे आव्हान  बँकेचे ग्राहकांना केले. Samarth Bhandari Urban Credit Institution launched at Palshet

चिपळूण अर्बन बँकेचे संचालक प्रशांत शिरगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे कामकाज नियोजनबद्ध सुरू असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर व त्यांचे सहकारी संचालक यांनी संस्थेचे कामकाज चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहे. तसेच पालशेत सारख्या ठिकाणी संस्थेने शाखा सुरू करून येथील बाजारपेठेत ठेवीदार व ग्राहकांना व्यवहार करण्याची नवी संधी निर्माण करून दिली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. Samarth Bhandari Urban Credit Institution launched at Palshet

या कार्यक्रमाला पालशेत विविध कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष रवींद्र कानिटकर निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बापट संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक दिलीप मयेकर, सुहास भोसले, विजय जाधव, पराग आरेकर, उदय वेल्हाळ, स्मिता आरेकर, प्रज्ञा नरवणकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष शशिकांत  बिर्जे, राजेंद्र नरवणकर, महेश तोडणकर राकेश नार्वेकर, प्रशांत सुर्वे, पांडुरंग विलनकर, प्रशांत वायगणकर ,मोहन पाटील व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव संदीप  रहाटे यांनी केले. Samarth Bhandari Urban Credit Institution launched at Palshet

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSamarth Bhandari Urban Credit Institution launched at PalshetUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet57
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.