गुहागर, ता. 10 : श्री समर्थ भंडारी नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १५/०६/२०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ, वीरेश्वर कॉलनी चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. Samarth Bhandari Credit Society Annual Meeting


या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे हिताचे विविध विषय ठेवण्यात आले आहेत. तसेच संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. यामध्ये दहावी ८० टक्के गुण व बारावी ६५ टक्के गुण तसेच पदवीधर पदविका ६० टक्के गुण किंवा प्रथम श्रेणीतील विद्यार्थी व विशेष पुरस्कार प्राप्त सभासद आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेला जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव संदीप रहाटे यांनी केले आहे. Samarth Bhandari Credit Society Annual Meeting