गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हयातील एक विश्वासार्ह आणि ग्राहकांना विनम्र सेवा देणारी पतसंस्था श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला या आर्थिक वर्ष २०२३ / २४ अखेर रूपये १३ कोटी ३६ लाख ढोबळ नफा झाला असून आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्यानंतर संस्थेला रुपये ५ कोटी २६ लाख निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली. Samarth Bhandari Credit Institution
संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्रात १७ शाखा व ०२ कलेक्शन सेंटर यासह कार्यरत असलेल्या संस्थेने नियोजनबध्द कामकाजा बरोबरच विश्वासार्हता, पारदर्शकता, व्यावसयिकता तसेच सुरक्षितता यांना प्राधान्य दिल्यामुळे तसेच संस्थेचे सभासद व ठेवीदार तसेच कर्जदार यांचा संस्थेवरील दृढ विश्वास व सहकार्य यामुळेच संस्थेने सर्वच स्तरावर प्रगती साध्य केली आहे. दिनांक ३१/०३/२०२४ अखेर संस्थेच्या एकुण ठेवी रु.१८३ कोटी २१ लाख झाल्या असून मागील वर्षापेक्षा ठेवींमध्ये २९ कोटी ८० लाखांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा एकुण कर्जव्यवहार रु.१४५ कोटी ६३ लाख असून कर्ज व्यवहारामध्ये २२ कोटी ६९ लाख वाढ झाली आहे. दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेचे भागभांडवल रु. ९ कोटी ८१ लाख, निधी १२ कोर्टी ४९ लाख, गुंतवणूका रु.७२ कोटी ३८ लाख तसेच संस्थेचे खेळते भांडवल रु. २३३ कोटी २८ लाख झाले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ३२८ कोटी ८४ लाख झालेला आहे. संस्थेने सभासद, ठेवीदार व ग्राहक यांना चांगल्याप्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला असून संस्थेला सर्वांकडून नेहमीच प्रतिसाद मिळालेला आहे. Samarth Bhandari Credit Institution
संस्थेने केलेल्या कर्जवितरणामध्ये सोनेतारण व स्थावरतारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचे प्रमाण सर्वाधिक असून सुरक्षित कर्ज वितरण व नियोजनबध्द वसुली यामुळे संस्थेच्या थकबाकीचे एकुण कर्जाशी प्रमाण केवळ 0.12 टक्के आहे. तसेच संस्थेने दिनांक 31 मार्च 2024 अखेर एनपीएचे प्रमाण 0% राखलेले आहे. संस्थेमध्ये सीबीएस प्रणाली द्वारे ग्राहकांना सेवा देण्यात येत असून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये बँकिंगच्या बहुतांशी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, तसेच सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांचे महत्त्वाचे योगदान व सहकार्य असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर यांनी सांगितले. Samarth Bhandari Credit Institution