• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा

by Manoj Bavdhankar
July 13, 2023
in Guhagar
138 2
0
Samadhi ceremony of Saint Shiromani Namdev Maharaj
272
SHARES
777
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१५ जुलै रोजी शिंपी समाज मंडळातर्फे आयोजन; श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृह

गुहागर, ता.13 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा शनिवार दिनांक १५ जुलै २०२३ रोजी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Samadhi ceremony of Saint Shiromani Namdev Maharaj

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे, प्रा. रश्मी आडेकर (खरे ढेरे महाविद्यालय गुहागर), शार्दुल भावे, (श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर) उपस्थित रहाणार आहेत. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सकाळी ८.वा. श्री संत नामदेव महाराजांची पूजा व श्री सत्यनारायणाची पूजा, सकाळी १० ते १२ वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दुपारी ३ वा. महीलांसाठी विविध खेळ, सायंकाळी ५ वा. स्वरसाधना महिला भजन मंडळ यांचे भजन गायक – सौ. आदिती गणेश धनावडे व हळदी कुंकू समारंभ हे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. Samadhi ceremony of Saint Shiromani Namdev Maharaj

तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने करण्यात आले आहे. Samadhi ceremony of Saint Shiromani Namdev Maharaj

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSamadhi ceremony of Saint Shiromani Namdev MaharajUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.