गिमवी ग्रामदेवतेच्या सोहळ्यासाठी गावातील ग्रामस्थ एकवटणार
गुहागर, ता. 28 : गुहागर तालुक्यातील गिमवी ग्रामदेवता श्री खेम झोलाई देवीचा समा उत्सव (जत्रा) आणि पारंपरिक पद्धतीने प्रथेनुसार लाट फिरविण्याचा कार्यक्रम आज दि. २८ रोजी रात्रौ १० वा. मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे मेहनत घेत आहेत. Sama Festival of Gimvi Shri Khem Zolai Devi
गिमवी येथील झोलाई देवी मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. श्री झोलाई देवी सर्व भाविकांच्या इच्छा पूर्ण करणारी असल्याने अनेकांची तिच्यावर श्रद्धा आहे. गावातील ग्रामस्थ गुण्यागोविंदाने देवीचा हा उत्सव साजरा करत असतात. श्री खेम झोलाई मंदिरात मुख्य देवता झोलाई, खेमबावा, वाघजाई, मानाई, कालकाई व शंकर पिंड आहे. गावात मशिद बावा म्हणून पहीला मान त्यांना नारळ दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. गावात मुस्लिम वस्ती नाही, पण मशिद बावाचे घरवंद आहे. खालचीवाडी, मधलीवाडी, वरचीवाडी, सुतारवाडी, बाईतवाडी, मावळतीचीवाडी, काजळीवाडी अशा वाड्या मिळून ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करतात. मुंबईकर चाकरमानी आवर्जून या सोहळ्यासाठी गावात दाखल होतात. Sama Festival of Gimvi Shri Khem Zolai Devi
लाटेवर पहीला मानकरी, दुसरा मानकरी हे जाधव कुटुंबातील सदस्य व तिसरा गावकर (परीट) समाज कुटुंबातील असतात. ते लाटेवर फिरतात. सहावा मानकरी जाधव कुटुंबापैकी असतो. ते लाटेवरून खोबरे प्रसाद म्हणून वाटप करतात. सनई ढोल ताशांच्या गजरात डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. तसेच पालखीहि फुलांनी सजवली जाते. गावात मराठा जाधव, कुणबी बाईत, गिमवकर (सुतार) व कदम (परीट) हे मानकरी आहेत. Sama Festival of Gimvi Shri Khem Zolai Devi
या गावात गेली १३ वर्ष सुरू असलेला वाद जाधव कुटुंबातील बाधंवानी पुढाकार घेऊन मिटवला. याकामी गावातील मानकरी यांचे चांगले सहकार्य मिळाले. तसेच गुहागर तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे व पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांचे देखील सहकार्य लाभले. त्यामुळे यंदाचा हा उत्सव गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहेत. या उत्सवानिमित्त टीडब्ल्यूजे यांच्या सौजन्याने जल्लोष 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे. Sama Festival of Gimvi Shri Khem Zolai Devi