नौसेना, जिल्हा प्रशासन, सागरी सीमा मंच व नागरीकांची उपस्थिती
अलिबाग, ता. 06 : सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने असलेल्या आय एन एस्.नौकेचा मी प्रमुख आहे. संरक्षण दलाची वर्दी केवळ पोशाख नसून ती एक अभिमान आहे, शिस्तबध्द जीवन जगण्यासाठीची एक प्रेरणा आहे, असे प्रतिपादन आय एन एस्. आंग्रेचे कमांडंट आदित्य हाडा यांनी केले. ते दर्यासागर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या 294 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलत होते. Salutations to Angre, son of Ratnagiri
स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त 4 जुलैला अलिबाग येथे भारतीय नौसेना, जिल्हा प्रशासन व सागरी सीमा मंच यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै या गावचे सुपुत्र असलेल्या कान्होजी आंग्रे यांनी सुरत ते गोवा या सागरी किनारपट्टीवर स्वराज्याचा भगवा फडकवला. इंग्रज, पोर्जुगीज, डच आणि फ्रेंच या परकीय आक्रमकांचे किनारपट्टीवरील वर्चस्व मोडित काढले. त्यांच्या अतुलनीय साहसाचे स्मरण व्हावे म्हणून भारतीय नौदलाने आपल्या पश्चिम विभागाला आय.एन.एस. आंग्रे असे नाव दिले. इतकेच नव्हे तर दरवर्षी कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीला अलिबाग येथील त्यांच्या समाधी स्थळावर भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. आंग्रे विभागातील अधिकारी शासकीय इतमामात अभिवादन करण्यासाठी येतात. पोलीसांतर्फे कान्होजी आंग्रेना अभिवादन केले जाते. Salutations to Angre, son of Ratnagiri
यावर्षी कान्होजीराजे आंग्रे यांच्या 294 व्या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग येथील मुख्य कार्यक्रमाला कमांडंट आदित्य हाडा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते. कमांडर आदित्य हाडा यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर पोलिस दलाने मानवंदना दिली. यावेळी मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, नौसेना, कमांडंट आदित्य हाडा, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट प्रशांत गोजरे, तटरक्षक दलाचे सहाय्यक अमोलकुमार मुसळे, माजी उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, प्रदिप नाईक,संजना किर, वृषाली ठोसर, डॉ. निशिगंध आठवले, नागेश कुलकर्णी, दुर्गरक्षक सामाजिक संस्था अध्यक्ष सिद्धार्थ नाईक, अलिबाग नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी, व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. Salutations to Angre, son of Ratnagiri
सागरी सीमा मंच या संस्थेतर्फे अभिवादन समारंभानंतर मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटरसायकल रॅलीला कमांडर आदित्य हाडा, रघुजीराजे आंग्रे व सागरी सीमा मंचचे प्रांत संघटनमंत्री अनिकेत कोंडाजी यांच्या उपस्थित सुरवात झाली. अलिबाग शहरातून ही रॅली कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळी पोचली. तेथे आजच्या काळात सागरी किनारपट्टीवरील आक्रमणे, आव्हाने आणि सुरक्षात्मक उपाय याबाबत तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. Salutations to Angre, son of Ratnagiri
समाधीस्थळाला संरक्षण हवे
शहरातील आंग्रे समाधी स्थळ परिसराच्या पावितत्र्याला काही महिण्यापासून धक्का लागणारी कृत्य घडत आहेत. यामुळे शहराच्या ऐतिहातिक प्रतिमेला तडा जात आहे. असे वादादीत असणारे प्रकार थांबविण्यासाठी आंग्रे समाधी स्थळ येथे दोन सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच आंग्रे उद्यान नाद बदलून आंग्रे समाधी स्थळ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी दुर्गरक्षक सामाजिक संस्था अध्यक्ष सिद्धार्थ नाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी जिल्हा पोलिस देखील या परिसरावर नजर ठेवतील. असे आश्वासन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. Salutations to Angre, son of Ratnagiri