आंबा काजूच्या संरक्षणासाठी जबाबदारी राजस्थानी बंदुकीने घेतली
गुहागर, ता. 26 : आंबा व काजू संरक्षणासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र, शृंगारतळी बाजारपेठेमध्ये राजस्थानी बनावटीची पीव्हीसी पाईपद्वारे बनवलेली २५० रु. किमतीची राजस्थानी बंदूका विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. Sale of Rajasthani Guns in Sringaratali
सध्या कोकणात काजू तयार झाला असून आंब्याला नुकतीच फलधारणा झाली आहे. जंगली प्राण्यांकडून या बागायतींची नासधूस केली जात आहे. त्यात प्रामुख्याने वानरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रत्येक गावामध्ये या वानरांची मोठ्या प्रमाणात झुंड दिसून येत आहे. वाडीवस्तीमध्ये येवूनही घरांच्या छ्प्परांचे नुकसान केले जात आहे. मात्र, आंबा व काजू बागायतीची काळजी घेण्याची जबाबदारी राजस्थानी बंदुकीने घेतली आहे. Sale of Rajasthani Guns in Sringaratali
शृंगारतळी येथील पालपेणे फाटा ब्रिजजवळ तसेच वेळंब फाटा येथे राजस्थानी महिला व पुरुष यांनी रस्त्यावरच आपला धंदा मांडला आहे. या पीव्हीसी पाईपद्वारे बनवलेल्या बंदुकीला मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. या बंदुकीमध्ये फॉस्फेटचा एक छोटा खडा टाकून त्यावर पाणी टाकल्यास या बंदुकीला असलेल्या लाईटरचे बटन दाबल्यावर बंदुकीतून येणाऱ्या आवाजासारखा आवाज येतो. हा आवाज वानरांना अथवा जंगली प्राण्यांना पळविण्यासाठी योग्य आहे. Sale of Rajasthani Guns in Sringaratali
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी व बागायतदार वानरांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत. वानर व वन्य प्राणी शेतीचे खूप नुकसान करित आहेत. अनेक बागायतदार नेपाळी ( गुरखा ) या आंबा, काजूच्या बागा राखण्यासाठी ठेवतात. परंतु, या राखणदार यांच्यावर मोठा खर्च होतो. त्यात त्यांची पोलीस स्थानकात नोंदणी केल्याशिवाय बागेमध्ये ठेवता येत नाहीत. या सर्व प्रकाराला पर्याय म्हणून ही राजस्थानी बंदूक आहे. Sale of Rajasthani Guns in Sringaratali