गुहागरातील एक दाम्पत्य ताब्यात?
गुहागर, ता. 03 : मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणार्या टोळीचा पर्दाफाश नुकताच केला. एका डॉक्टरसह ७ जणांना अटक केली. चौकशीदरम्यान या टोळीने चौदा बालकांची विक्री केल्याचे पुढे आले. यातील एक बाळ रत्नागिरी जिल्ह्यातही विकल्याची माहिती हाती आली होती. या पार्श्वभूमीवर गुहागरमधील एका दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. स्थानिक पोलिसांना त्याविषयी अधिक माहिती नसल्याचे बोलले जाते. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचे एक पथक गुहागरात आले आणि संशयित दाम्पत्याला ताब्यात घेतले अशी माहिती मिळते. मात्र तिला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. Sale of babies
पोलीस तपासात हे बाळ रत्नागिरी जिल्ह्यात विकले गेल्याचे समोर आले होते. या टोळीत एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे कळते. या दाम्पत्याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे हे समजू शकलेले नाही. एकूण १४ मुले या टोळीने विकल्याचे पुढे आले आहे. कमीत कमी ४ ते ५ दिवसांच्या अर्भकासह जास्तीत जास्त ९ महिन्याच्या बाळाची विक्री करण्यात आल्याचे वृत्त आहे. Sale of babies