• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरचे आरेकर यांचा पुतन्या अजित पवार गटात

by Ganesh Dhanawade
January 6, 2024
in Guhagar
179 2
1
Sahil Arekar joins Ajit Pawar group
351
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी केला प्रवेश

गुहागर, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय जिल्हाध्यक्ष आणि राज्यात राष्ट्रवादी गटात फूट पडल्यानंतर शरद पवार गटात राहिलेले साहिल आरेकर यांनी कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. Sahil Arekar joins Ajit Pawar group

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, गुहागरचे माजी पंचायत समिती सभापती स्व. सदानंद आरेकर यांचा नातू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुकाप्रमुख पद्माकर आरेकर यांचे पुतणे श्री. साहिल प्रदीप आरेकर सिव्हिल इंजिनिअर असून ते स्वतः शासकीय ठेकेदार म्हणून कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करीत आहेत. घरातच राजकीय वारसा असल्याने साहिल आरेकर यांनी महाविद्यालय शिक्षण पूर्ण होताच राजकारणात सक्रिय झाले. काका पद्माकर आरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष आहेत. लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर या संस्थेच्या माध्यमातून सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात ते काम करत आहेत. Sahil Arekar joins Ajit Pawar group

सन २०१८ ते २०२२ या कालावधीत साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर काम केले आहे. तसेच यशाबताय चव्हाण सेंटर मुंबई जिल्हा केंद्र रत्नागिरीच्या युबा समन्वयक पदावर देखील ते काम करीत आहेत. शिवाय सर्वसामान्य लोकांसाठी नोकरी विषयक, आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी नेहमीचा तत्पर असतात. गुहागराला युवक-युवती यांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दरवर्षी किनारा महोत्सवाचे आयोजन केले. कोरोना आणि चिपळूण महापुरात आरेकर यांनी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे. आरेकर यांनी केवळ राजकीय विचार न करता सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यात युबक कार्यकर्ते जोडण्याचे काम साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केले आहे. आरेकर यांनी आपले राजकीय गुरू खा. सुनिल तटकरे व आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून अनेकांची कामे केली आहेत. आज त्यांच्याच माध्यमातून अजित पवारांच्या गटात सामील झाले आहेत. येत्या काही दिवसात केवळ गुहागर मतदार संघच नाही, तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार गटात सामील होणार आहेत. Sahil Arekar joins Ajit Pawar group

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSahil Arekar joins Ajit Pawar groupUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share140SendTweet88
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.