• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा वाढदिवस साजरा

by Ganesh Dhanawade
June 18, 2023
in Guhagar
1.2k 12
0
Sahil_Aarekar_birthday_celebration
2.3k
SHARES
6.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

गुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. Sahil Aarekar birthday celebration

Sahil_Aarekar_birthday_celebration

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, गुहागरचे माजी पंचायत समिती सभापती स्व. सदानंद आरेकर यांचा नातू श्री. साहिल प्रदीप आरेकर सिव्हिल इंजिनिअर असून ते स्वतः शासकीय ठेकेदार म्हणून कन्स्ट्रक्शन व्यवसायात काम करत आहेत. घरातच राजकीय वारसा असल्याने साहिल आरेकर यांनी महाविद्यालय शिक्षण पूर्ण होताच राजकारणात सक्रिय झाले. काका पद्माकर आरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर या संस्थेचा कार्यभार हातात घेत सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात ते काम करत आहेत. Sahil Aarekar birthday celebration

Sahil_Aarekar_birthday_celebration

सन २०१८ ते २०२२ या कालावधीत श्री. साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदावर काम केले आहे. आज ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई जिल्हा केंद्र रत्नागिरीच्या युवा समन्वयक पदावर देखील ते काम करत आहेत. Sahil Aarekar birthday celebration

साहिल आरेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नेते दादा साळवी, जयंत शिंदे, प्रकाश पवार, मनोज जाधव, चिपळूण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष निलेश कदम, विकास गमरे, अल्लाद यादव, सचिन शिंद, संतोष सुतार, प्रवीण कदम, सचिन साडविलकर हे उपस्थित होते. तर गुहागरमध्ये शासकीय विश्रागृहावर झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव श्री. प्रदिप बेंडल, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर, श्री. माळी, नगरसेविका सौ. सुजाता बागकर, सौ. स्वाती कचरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर तालुका उपाध्यक्ष श्री. तुषार सुर्वे, खजिनदार श्री. दीपक शिरधनकर, ओबिसी जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. सिद्धी आरेकर, माजी नगरसेवक श्री. मयुरेश कचरेकर, लोकनेते स्व.सदनद आरेकर प्रतिष्ठान उपाध्यक्ष श्री.शुभम भयनक, खजिनदार श्री. पुष्कर शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष श्री. सौरभ भागडे, रोहित मालप, अभिषेक भोसले, प्रथमेश जांगळी, रोहित खातू, स्वामिन भोसले, सुमित आरेकर, आकाश कचरेकर, ॲड. अलंकार विखारे, गौरव विखारे, रुषिकेश जाधव, निखिल बेंडल, माधव भोसले, प्रसाद लोखंडे, प्रसन्न कनगुटकर, धीरज सुर्वे, संकेत चाळके, समीर आरेकर, द्विप कचरेकर, संदेश कचरेकर, अभिषेक गडदे, शुभम साखरकर, कौस्तुभ गद्रे, कौस्तुभ वैद्य, वैभवराज साखरकर, माधव भोसले, गौरव विखारे, अभिषेक भोसले, समीर आरेकर, विनायक आरेकर, शुभम चव्हाण, प्रथमेश जांगळी, वेदांत पडवळ आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Sahil Aarekar birthday celebration

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSahil Aarekar birthday celebrationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share921SendTweet576
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.