• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

by Mayuresh Patnakar
September 22, 2022
in Ratnagiri
17 0
0
Safe mother and home safe campaign
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हाधिकारी पाटिल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आरोग्य समितीचे नियोजन

गुहागर, ता. 22 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार, जिल्हयातील १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी दिनांक २६/०९/२०२२ पासून ०५/१०/२०२२ दरम्यान नवरात्री उत्सवात १८ वर्षावरील महिलांच्या आरोग्य तपासणीबाबतचा “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान जिल्हाभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.  त्यानुसार सदर उपक्रम कार्यक्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी  मा.श्री.परिक्षित दि. यादव यांनी सांगितले आहे. Safe mother and home safe campaign

सदरचे अभियान जिल्हाभर राबविण्यासाठी संबंधीत सर्व विभागांचा सहभाग घेण्यासाठी व नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी मा.श्री.बी.एन.पाटिल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची सभा दिनांक २१/०९/२०२२ रोजी घेण्यात आली. Safe mother and home safe campaign

या मोहिमेतील उपक्रमांचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा, यासाठी आशा/ अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका/सेवक यांनी घरोघरी जाऊन शिबीरे व उपलब्ध सुविधेबाबत माहिती देतील.  जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत शिबिरामध्ये महिलांना सेवा घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.  या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा व स्थानिक पातळीवर सभांचे नियोजन करण्याचे आहे.  याबाबत तालुकास्तरावर सुचना देण्यात आलेल्या आहेत. Safe mother and home safe campaign

 या अभियान काळात विविध उपक्रम दररोज सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान आयोजित करण्यात येत आहेत.   दिनांक ०५/१०/२०२२ पर्यंत जास्तीत जास्त माता व इतर १८ वर्षावरील महिलांच्या तपासणीचे आयोजन तसेच मोहिम संपल्यावर चांगले काम करणा-या संस्था व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.   प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत दररोज माता व महिलांच्या तपासणीची शिबिरे, मातांची तपासणी, आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भीत करण्यात येणार आहे. Safe mother and home safe campaign

त्याचप्रमाणे उपकेंद्र/आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांचेमार्फत मातांची तपासणी, समुपदेशन हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेट देऊन माता तपासणी, गरोदर माता तपासणी, समुपदेशन १८ वर्षावरील महिलांची तपासणी करावी.  त्यासाठी अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत तपासणी शिबिरे घेऊन, आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भीत करावे.  ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्धततेनुसार स्त्रीरोग तज्ञामार्फत दररोज तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करुन, यासाठी सेवाभावी स्त्रीरोग तज्ञ यांची मदत घेण्यात येत आहे.  यामध्ये जोखमीच्या माता तसेच इतर स्त्रीरोग आजाराच्या माता/महिला (१८ वर्षावरील) संदर्भीत होतील याचे नियोजन करण्यात येत आहे असे मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले /गावडे यांनी सांगितले.   सदर अभियान कालावधीत आरबीएसके पथके शाळा तपासणी नंतर गावात भेट देवून, तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम घेतील. Safe mother and home safe campaign

या अभियान दरम्यान नवविवाहीत महिलांवर विशेष लक्ष देण्यात येत असुन, त्यांचे तपासणीचे आणि समुपदेशनाचे विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याबाबत गर्भधारणापूर्व काळजी कार्यक्रमाची मार्गदर्शक समुपदेशन करण्यात येईल.  तसेच सोनोग्राफी शिबिरे आयोजित करुन, त्यात जास्तीत जास्त गरोदर मातांची तपासणी होईल याचे नियोजन करण्यात येत आहे.  कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत नवविवाहीत जोडप्यांना व दोन अपत्य असणा-या मातांना पाळणा लांबविणेबाबत व दोन अपत्यांवरील मातांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाबाबत माहिती देण्यात येणार आहे. Safe mother and home safe campaign  

तरी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या महत्वाकांक्षी अभियानाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले असुन, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले. Safe mother and home safe campaign

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSafe mother and home safe campaignUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.