आबलोलीचे प्रयोगशील शेतकरी; संशोधीत केलेल्या SK-4 हळदीचे वाण
गुहागर, ता.10 : गेली २० वर्षे राबून आणि सातत्य राखून आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार त्यांनी संशोधीत केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -४) या हळदीच्या वाणाबद्दल राष्ट्रपती भवन येथे देण्यात आला. Sachin Karekar honored by the President

सचिन कारेकर यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा यथोचित सन्मान केला. कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या सहाय्याने शेतीमध्ये विविध प्रयोग करताना SK-4 (स्पेशल कोकण -४) या हळदीच्या वाणाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. Sachin Karekar honored by the President

नवोपक्रम आणि उद्योजकतेचा उत्सव या उपक्रमांतर्गत नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून सचिन कारेकर यांच्या कृषी क्षेत्रातील तळागाळातील संशोधनाबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. यासाठी सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. Sachin Karekar honored by the President
