मुंबई, ता. 23 : मुंबईत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. मंगळवार दि. 27 रोजी हा सण अवघ्या महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असून या दिवशी राज्यात दहीहंडीचा जल्लोष असणार आहे. त्यामुळे मुंबईत गैरप्रकार टाळण्यासाठी व हा सण शांततेत साजरा होण्यासाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास कठोर कारवाई होणार आहे. Rules for Dahi Handi announced
मुंबईत दहीहंडीचा जल्लोष राज्यात सर्वाधिक असतो. शहरात ठिकठिकाणी विविध मंडळातर्फे या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. उंचावर असलेली ही दहीहंडी फोडण्यासाठी उंच मानवी मनोरे तयार केले जातात. यात विविध गोविंदा पथके सहभागी होत असतात व या हंड्या फोडत असतात. यासाठी त्यांना मोठे बक्षीस देखील दिले जाते. नागरिक सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या या उत्सवात गोविंदा यांच्या अंगावर रंगीत पाणी फेकतात. बऱ्याचदा यावरून वाद होतात. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अनेक वाद होत असतात. यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते. यावर्षी दहीहांडीचा जल्लोषात साजरा होत असतांना गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनातर्फे पावले उचलली असून काही नियमावली जारी करण्यात आली आहे. Rules for Dahi Handi announced
यावर्षी २६ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. या दिवशी मध्यरात्रीपासून ही नियमावली लागू करण्यात येणार असून ती २७ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे या नियमांच उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या काळात जर सार्वजनिकरित्या अश्लील शब्द उच्चारणे, विविध घोषणा देणे किंवा अश्लील गाणी गाणे, हातवारे किवा नक्कल करणे विविध प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू वापरुन सार्वजनिक शांततेला भंग पोचवणे, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर रंगाचे पाणी फेकणे, पाण्याने भरलेले फुगे फेकणे या सारख्या अनेक बाबींना बंदी घालण्यात आली आहे. असे करतांना कुणी आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे. Rules for Dahi Handi announced