एनसीसी नेमबाजी स्पर्धेत भारतात दुसरा क्रमांक ; कोश्यारी यांची कौतुकाची थाप
रत्नागिरी, ता. 20 : चंदीगड येथे ६ जुलै रोजी एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील आरवलीची सुकन्या रुई विनायक विचारे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी केली आहे. हिने महाराष्ट्राला एनसीसी कॅडेट्सनी सलग दुसऱ्या वर्षी प्रथम विजेतेपद मिळवून दिले आहे. या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (19 जुलै ) रुईसह महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कॅडेट्सचा गौरव केला. Rui’s second place in shooting competition
चंदीगडमधील स्पर्धेत सहभागी झालेल्या रुई विचारे हिने ५० मीटर रायफल शूटिंग प्रकारात चमकदार कामगिरी केली. तिने तिच्या गटातून खेळताना संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. पन्नास मीटर रायफल शूटिंगमध्ये तामिळनाडूतील मुलीने प्रथम तर रुई विचारे हिने दुसरे स्थान पटकावले. कॅडेट्सनी महाराष्ट्र राज्याला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून दिले. याची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कॅडेट्सना मंगळवारी 19 जुलैला राजभवनात बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. Rui’s second place in shooting competition
चंदीगड पार पडलेल्या आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध गटांमधून 17 कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यात सध्या शिक्षणानिमित्त पुणे येथे असलेल्या रुई विचारे हिचाही समावेश होता. मूळची संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेली रुई विचारे ही सध्या पुण्यातील गरवारे महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. Rui’s second place in shooting competition