गुहागर, ता. 21 : नवतरुण उत्कर्ष मंडळ धनावडेवाडी उमराठ यांच्या विद्यमाने रॉयल स्ट्रायकर्स चषक २०२५ पर्व १ ले रविवार दिनांक २०/४/२०२५ रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन विरार येथील शिरगाव मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ८.०० वाजता क्रिकेट प्रेमी आणि वाडीचे वरिष्ठ मान्यवर श्री सोनू रा.धनावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. Royal Strikers Cup 2025
या प्रीमियर लीगमध्ये प्रथम क्रमांक श्री दत्तगुरु क्रिकेट संघ जामसुद, द्वितीय क्रमांक श्री देव भराडा क्रिकेट संघ उमराठ आंबेकर वाडी यांनी पटकावला. विजेता संघास रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज प्रवीण डिंगणकर श्री दत्तगुरु क्रिकेट संघ जामसुद, तर उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर प्रफुल्ल आंबेकर श्री देव भराडा क्रिकेट संघ उमराठ आंबेकर वाडी हे मानकरी ठरले. Royal Strikers Cup 2025


यावेळी वाडीतील वरिष्ठ मंडळी श्री सोनू धनावडे, श्री हरी धनावडे, श्री सुनील धनावडे, सुरेश धनावडे, संजय धनावडे, संदीप धनावडे, शांताराम धनावडे व वाडीतील ईतर मंडळी उपस्थित होती. या लीग साठी पाण्याची व्यवस्था श्री संदीप गावनंग यांनी केली. पंच म्हणून महेंद्र धनावडे, संतोष (बाबू) धनावडे, मंगेश धनावडे, संदीप गावनंग, सचिन गावनंग, महेंद्र आंबेकर यांनी सहकार्य केले. स्कोअर बुक लिहिण्याचे काम श्री आनंद धनावडे, संदीप धनावडे, ऋतिक धनावडे, मोहन धनावडे यांनी बजावले. मैदानावरील क्रिकेट समालोचक म्हणून श्री विजय धनावडे, निनाद कदम, सचिन आंबेकर , विकास आंबेकर, विवेक आंबेकर यांनी काम पाहिले. Royal Strikers Cup 2025
ही प्रीमियर लीग यशस्वीतेसाठी नवतरुण उत्कर्ष मंडळ धनावडे वाडी या मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी कमिटी आणि सभासद, धनावडे वाडी महिला मंडळ या सर्वांचा हातभार लागला. या संपूर्ण लीगसाठी लाभलेले देणगीदार यांचेही आभार मानण्यात आले. Royal Strikers Cup 2025