• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जे. ई. ई. मेन्स परीक्षेमध्ये रोटरी स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांचे यश

by Guhagar News
April 19, 2025
in Ratnagiri
61 1
2
Rotary School students' success in JEE Mains examination
120
SHARES
344
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेसाठी रोटरी स्कूलचे 64 विद्यार्थी पात्र

गुहागर, ता. 19 :  माहे जानेवारी व एप्रिल 2025 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. मेन्स या व्दितीय फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील इयत्ता 12वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे. Rotary School students’ success in JEE Mains examination

जे.ई.ई मेन्स परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु . केवल खापरे ( 99.70 पर्सेनटाईल ) गुण मिळवत कोकण विभागात प्रथम, कु. अश्लेषा देवधर ( 99.62 पर्सेनटाईल ) गुण मिळवत कोकण विभागात द्वितीय, कु. साहिल अंगज ( 99.42 पर्सेनटाईल ) गुण मिळवत कोकण विभागात तृतीय, कु. रोनक शेठ (99.42 पर्सेनटाईल) कु. ओम जैन (99.30 पर्सेनटाईल), कु. निल लिमये (99.25  पर्सेनटाईल), कु. मानस राऊल (99.00 पर्सेनटाईल) गुण प्राप्त केले. Rotary School students’ success in JEE Mains examination

त्याचप्रमाणे 12 विद्याथ्र्यांनी 98 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण 18  विद्यार्थ्यांनी 97 पर्सेनटाईल पेक्षा  अधिक गुण, 21 विद्यार्थ्यांनी 96 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 27 विद्यार्थ्यांनी 95 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण व 40 विद्यार्थ्यांनी 90 पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशस्वितेची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Rotary School students’ success in JEE Mains examination

दरवर्षीप्रमाणे यंदाही जे.ई.ई परीक्षेचा दैदिप्यमान निकाल देणारी रत्नागिरी जिल्ह्यातील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड ही एकमेव शाळा ठरली आहे. इयत्ता 12वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या  जाणाऱ्या जे. ई. ई. मेन्स या परीक्षेमध्ये विद्यार्थी सर्वोच्च गुण मिळवून जे. ई. ई. ॲडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होत असतात. तद्नंतर जे. ई. ई. ॲडव्हान्स या परीक्षेच्या अंतिम गुणांवर विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील  इंजिनिअरिंग कॉलेज आणि  IIT, NIT साठी पात्र ठरतात. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी जे. ई. ई. मेन्स या प्रथम फेरी परीक्षेत आपल्या शाळेतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने तसेच मेहनत, जिद्द व चिकाटीच्या बळावर यश प्राप्त केले. Rotary School students’ success in JEE Mains examination

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स विषय शिक्षक प्रा. राकेश स्वर्णकार, प्रा. कुलदीप गुप्ता, मॅथ्स् विषय शिक्षक प्रा. हुसैन मुबारक, प्रा. विशाल सिंग, केमेस्ट्री विषय शिक्षक प्रा. अचितानंद झा, प्रा. जतिन गुप्ता यांचे तसेच वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे. ई. ई. मेन्स या द्वितीय फेरी प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary School students’ success in JEE Mains examination

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRotary School students' success in JEE Mains examinationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.