केवल खापरे ( 99.70) प्रथम, साहिल अंगज (99.42) द्वितीय तर अश्लेषा देवधर (99.34) तृतीय
गुहागर, ता. 12 : माहे जानेवारी 2025 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. मेन्स या प्रथम फेरी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील इयत्ता 12 वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जे.ई.ई. परीक्षेचा दैदिप्यमान निकाल देणारी रत्नागिरी जिल्ह्यातील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड ही एकमेव शाळा ठरली आहे. Rotary School dominates J. E. E. Mains exam
जे.ई.ई. मेन्स परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. केवल खापरे (99.70 पर्सेनटाईल) गुण मिळवत कोकण विभागात प्रथम, कु. साहिल अंगज (99.42 पर्सेनटाईल) गुण मिळवत कोकण विभागात द्वितीय, कु. अश्लेषा देवधर (99.34 पर्सेनटाईल ) गुण मिळवत कोकण विभागात तृतीय, कु. मानस राऊल (99.00 पर्सेनटाईल) गुण प्राप्त केले. तसेच 7 विद्यार्थ्यांनी 98 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 13 विद्यार्थ्यांनी 97 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 18 विद्यार्थ्यांनी 96 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण, 24 विद्यार्थ्यांनी 95 पर्सेनटाईलपेक्षा पेक्षा अधिक गुण व 37 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 90 पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशस्वितेची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Rotary School dominates J. E. E. Mains exam


इयत्ता 12 वी नंतर पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या जे. ई. ई. मेन्स या परीक्षेमध्ये विद्यार्थी सर्वोच्च गुण मिळवून जे. ई. ई. ॲडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होत असतात. तद्नंतर जे. ई. ई. ॲडव्हान्स या परीक्षेच्या अंतिम गुणांवर विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील इंजिनिअरिंग काॅलेज आणि IIT, NIT साठी पात्र ठरतात. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी जे. ई. ई. मेन्स या प्रथम फेरी परीक्षेत आपल्या शाळेतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने तसेच मेहनत, जिद्द व चिकाटीच्या बळावर यश प्राप्त केले. Rotary School dominates J. E. E. Mains exam
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स्, केमेस्ट्री, फिजिक्स या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे. ई. ई. मेन्स या प्रथम फेरी प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary School dominates J. E. E. Mains exam