गुहागर, ता. 14 : मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी सी. बी. एस. ई. बोर्डाच्या इ. 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इ.12वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये कु. वेदांत ओक याने अकाॅंटंट या विषयात 100 पैकी 100 व ( 98.2%) गुण मिळवत कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. कु. श्रीश शेट याने अकाॅंटंट या विषयात 100 पैकी 100 व ( 95.6%) गुण मिळवत कोकण विभागात द्वितीय तर कु. शल्तियल काळे याने ( 94.4% ) गुण मिळवत कोकण विभागात तृतीय क्रमांक पटकावून आपल्या निरंतर यशाची परंपरा कायम राखली आहे. Rotary School dominates in 12th results

90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी
कु. गार्गी पाथरे हिने ( 94.2%), कु. अपूर्वा खोत हिने ( 93.8%), कु. अदिबा मारुफ याने ( 93.8%), कु. जुईली पाटील हिने ( 92.8%), कु. क्रिष्णा गुप्ता याने बिझनेस स्टडी या विषयात 100 पैकी 100 व ( 93%), कु. आशय पाटणे याने ( 91.4%), कु. अद्वैत कुरुप याने ( 91%), कु. सलोनी दिवेकर हिने ( 91%), कु. आस्था पालांडे हिने ( 90.8%), कु. इशान लोकरे याने ( 90%), कु. पियुष गुप्ता याने ( 90%) गुण प्राप्त केले. Rotary School dominates in 12th results
तसेच 8 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, 3 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, 5 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, 4 विद्यार्थ्यांनी 66 टक्क्यांपेक्षा अधिक गुण, तसेच 6 विद्यार्थ्यांनी 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले.

वरील सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, वाणिज्य शाखेतील प्रा. रुपाली बोडस, प्रा. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. स्वप्निल पंडीत, प्रा. अक्सा पोफळणकर, प्रा. संतोष पाटील, प्रा. श्रद्धा थरवळ, प्रा. शबाना मुसा, प्रा. धनुजा धूत या प्राध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary School dominates in 12th results