दि. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी; १०० चारचाकी व ४०० दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था
गुहागर, ता. 22 : चिपळूण येथे सन १९९७ पासून सलग २४ वर्ष सातत्याने रोटरॅक्ट या युवकांच्या संघटनेतर्फे फन् एन्. फेअर (Rotaract Fun and Fair) या महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरुपात केले जाते. गेली २ वर्ष कोव्हिड महामारीमुळे फन् एन्. फेअर होऊ शकलेले नाही. हा महोत्सव यंदा मोठ्या दिमाखदारपणाने आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. Rotaract Fun and Fair at Chiplun
सुरुवातीच्या काळात केवळ दोन दिवस चालणारा हा उत्सव गेली ४ वर्ष संपूर्ण आठवडाभर चालतो. निटनेटकेपणा, प्रदर्शन व विक्रीसाठी विविध राज्यामधील इतर वेळेला न दिसणाऱ्या वस्तू मनोरंजनाने दर्जेदार कार्यक्रम, अबाल-वृध्दांना मजा लुटता यावी, असे थरारक परंतू सुरक्षित असे खेळ तसेच शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेला स्वतंत्र मंडपामध्ये थाटलेला खाद्य महोत्सव आणि विशेष म्हणजे दरवर्षी ऐतिहासीक वास्तूंची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रतिकृती ही प्रवेशद्वार म्हणून डौलदार व भव्य स्वरुपात उभारली जाते. या सर्व बाबींमुळेच या ७ दिवसांमध्ये सुमारे ५० हजार लोक या फन् एन्. फेअर ला भेट देऊन प्रतिसाद देतात. Rotaract Fun and Fair at Chiplun

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच दि. २६ जानेवारी रोजी सुरु होणारे हे फन् एन्. फेअर दि. १ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. यावर्षी फन् एन्. फेअर गुहागर बायपास येथील बावशेवाडी, खंड येथे आयोजित करण्यात आले आहे. सातत्य, कल्पकता व भव्यता अशी बिरुदावली मिरवणाऱ्या या महोत्सवाची जय्यत अशी तयारी सुरु असून सुमारे १०० चारचाकी व ४०० दुचाकींच्या पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. Rotaract Fun and Fair at Chiplun
दि. २६ जानेवारी पासून सायंकाळी सुरु होणाऱ्या या महोत्सवामध्ये आठवडाभर रोज रात्री मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गायनाचे व नृत्याचे कार्यक्रम, जादूचे प्रयोग व स्त्रीयांसाठी होममिनीस्टर या कार्यक्रमाच्या धर्तीवर स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे. प्रचंड गर्दी होऊनही कुठेही चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी आयोजकांनी घेतली आहे. आपण एखाद्या स्टार हॉटेलमध्ये फिरत असल्याचा आपणाला भास होईल याची खात्री आयोजक देत आहेत. विशेष म्हणजे मेट्रो शहरांमध्ये असलेली अल्-बैक या खाद्य पदार्थांची फ्रेंचाईजी चिपळूणमध्ये सुरू होत असून ज्याचे लाँचींग या फन् एन्. फेअर मध्ये होणार आहे. त्याचा आस्वाद ही लोकांना येथे घेता येणार आहे. Rotaract Fun and Fair at Chiplun
दर्जेदार अशा या महोत्सवाचे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांनी साक्षीदार व्हावे व सहकार्य करावे असे आवाहन सतत २५ वर्षे हा कार्यक्रम करणारे आयोजक फैसल कास्कर, वैभव रेडीज, बाळा आंबुर्ले, शैलेंद्र सावंत, प्रसाद सागवेकर व राजा ओतारी यांनी केले आहे. Rotaract Fun and Fair at Chiplun
