गुहागर, दि.19 : पर्यटनाला चालना देण्याकरिता आयोजित कातळचित्र पर्यटन महोत्सवात येत्या रविवारी (ता. २७) सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि पर्यटन संचालनालय, कोकण विभाग आणि निसर्गयात्री संस्थेने सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. Rockart Cyclothon in Ratnagiri


थिबा पॅलेस ते देऊड येथील कातळशिल्प अशी ३७ किमीची सायक्लोथॉन होणार आहे. यामध्ये विजेत्यांना बक्षीसांसह सर्व सहभागी सायकलपट्टूंना प्रमाणपत्र, मेडल देण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले. पहिल्या 3 विजेत्यांना 5000 रुपये, 3000 रुपये व 2000 रुपये अशी विशेष पारितोषिके आहेत. सर्व सहभागींना मेडल व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. Rockart Cyclothon in Ratnagiri


कोकणात आढळणाऱ्या इसवीसनपूर्व 12000 मधल्या कातळशिल्पांचा रत्नागिरीकरांसह पर्यटकांना परिचय व्हावा, म्हणून हा महोत्सव होत आहे. सेव्ह हेरिटेज बिल्ड फ्युचर ही या महोत्सवाची थीम आहे. याचाच एक भाग म्हणून सायक्लोथॉन आहे. रत्नागिरी शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी निवास, भोजनाची व्यवस्था केली आहे. २७ ला सकाळी ६ वाजता सायक्लोथॉनला सुरवात होईल. थिबा पॅलेस, मारुती मंदिर, करबुडे फाटामार्गे जाकादेवी व देउड असे सायकलने पार करावयाचे आहे. Rockart Cyclothon in Ratnagiri
यापूर्वी सुवर्णसूर्य फाउंडेशनने गतवर्षी हेदवी ते गणपतीपुळे अशी ७२ किमीची सायक्लोथॉन आयोजित केली होती. त्या अनुभवावर ही सायक्लोथॉन यशस्वी करण्यासाठी फाउंडेशन मेहनत घेत आहे. सायकलपट्टूंना काही अडचण आल्यास वाहन व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, हायड्रेशन पॉईंट्स यासह अनेक गोष्टींची मदत केली जाणार आहे. बक्षीस वितरण समारंभ थिबा पॅलेस येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशशुल्क 850 रूपये आहे. यामधील काही रक्कम कातळशिल्पांच्या स्वच्छतेसाठी/संवर्धनासाठी वापरली जाईल. Rockart Cyclothon in Ratnagiri
अधिक माहितीसाठी प्रसाद देवस्थळी 9699777121 / 7350725600 यांच्याशी संपर्क साधावा.
रजिस्ट्रेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://pages.razorpay.com/pl_J8CImcv1vtqfVU/view

