रत्नागिरी, ता. 04 : दक्षिण रत्नागिरी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने सघोष वादनाच्या तालात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणवेशधारी सेविकांचे संचलन आयोजित केले आहे. उद्या (ता. ५) टिळकनगर उद्यान (पटवर्धन वाडी) येथून सायंकाळी ४.०० वाजता संचलन सुरू होऊन पटवर्धन वाडी, मारूती मंदिर, आरोग्य मंदिर, मजगाव रोड, पटवर्धन वाडी येथून पुन्हा टिळक नगर उद्यान येथे येणार आहे. Road walk on behalf of Rashtra Sevika Samiti


या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वीणा लेले, राष्ट्र सेविका समिती जिल्हा कार्यवाहिका अपर्णा आठवले मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी संचलनाचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हा सहकार्यवाहिका सौ. मीरा भिडे, शहर कार्यवाहिका सौ. शमिका गद्रे यांनी केले आहे. Road walk on behalf of Rashtra Sevika Samiti