तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, सा.बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार
गुहागर, ता. 30 : काम सुरु करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे भरले जात आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. शिवाय याच रस्त्याच्या नुतनीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी 5 कोटी मंजूर केले आहेत. हे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम उपअभियंता गुहागर यांच्यामार्फत हे काम का सुरु आहे. असा प्रश्र्न भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी उपस्थित केला आहे. Road pothole filling work is of poor quality
गुहागर तालुक्यातील मासू आवरे असोरे भातगाव या 24 किलोमिटरच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सध्या सुरु आहे. प्रत्येकी 12 किलोमीटरमधील खड्डे भरण्याचे काम ठेकेदार दीपक मनोहर जाधव यांना 8 डिसेंबर 2022 आणि सोनाली कन्स्ट्रक्शन यांना 27/12/2022 या तारखेने काम सुरू करण्याचे आदेश मिळाले. 45 लाख 63 हजार 633 रुपये मंजूर झाले. कामाची मुदत 12 महिने असून रस्ता सुस्थिती ठेवण्याचा कालावधी 24 महिन्याचा आहे. या 24 किलोमीटरच्या रस्त्याची इतकी दुर्दशा झाली आहे की, दोन्ही ठेकेदारांना रस्त्यावर बहुतांशी ठिकाणी पॅचिंग करावे लागणार होते. दरम्यान आंबेरे खुर्दचे सरपंच रवींद्र अवेरे यांनी 24 एप्रिलला उपअभियंता सा.बां. उपविभाग गुहागर यांना पत्राद्वारे नक्की कोणते खड्डे बुजवणार याबाबत या रस्त्याशी संबंधित सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांसोबत पहाणी करुन निश्चित करावे असे कळविले होते. मात्र उपअभियत्यांनी या पत्राबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. तसेच 15 मे च्या दरम्यान खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवात केली. Road pothole filling work is of poor quality
याबाबत बोलताना नीलेश सुर्वे म्हणाले की, सध्याचे कामही निकृष्ट दर्जाचे आहे. पावसाळ्यात पुन्हा हा रस्ता खड्ड्यातच जाणार आहे. काम करण्याचे आदेश डिसेंबरमध्ये मिळाल्यानंतर 5 महिन्यांनी या कामाला का सुरवात झाली. सरपंच अवेरे यांच्या पत्राप्रमाणे कोणते खड्डे भरायचे याची निश्चिती का झाली नाही. असा रस्ता पावसाळ्यात सुस्थितीत ठेवणार म्हणजे ठेकेदार नेमके काय करणार. पावसाळ्यानंतर या रस्त्याचे नुतनीकरण होणार आहे. या कामाची खरोखरच गरज होती का. या संपूर्ण प्रकरणाला वेगळाच वास येतोय. त्यामुळे कार्यकारी अभियंता यांनी या कामाची चौकशी करावी. या निकृष्ट कामाचे कोणत्याही प्रकारचे बिल आंबेरे,आवरे-असोरे, पाचेरीसडा, शिवणे, भातगाव, कोळवली ग्रामपंचायतीच्या सरपंचाना विश्वासात घेतल्याशिवाय संबंधित ठेकेदारांना देण्यात येऊ नये. अशी मागणी कार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही याबाबत कळविले आहे. Road pothole filling work is of poor quality