डांबरीकरण न झाल्यास २५ जानेवारी रोजी उपोषण
चिपळूण, ता. 15 : तालुक्यातील खडपोली येथील औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास २५ जानेवारीपासून खेर्डी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय किंवा औद्योगिक वसाहतीच्या मार्गावर उपोषणाला बसण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी खेर्डी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपअभियंता यांना दिले आहे. Road condition in Kherdi industrial estate
याबाबत कार्यालयात व वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार संपर्क साधून व प्रत्यक्ष बोलून वास्तव मांडले असताना देखील गांभीर्याने दखल घेत नाही, परिणामी असंख्य कामगार आणि वाहतूक करणाऱ्यांच्या जीवाशी आपण खेळत आहात का अशी शंका येत आहे. या मार्गावर काही ठिकाणी खड्डे गुढग्या एव्हढे पडले आहेत, ठिकठिकाणी झुडपे रस्त्यावर व वळणावर वाढलेल्या अवस्थेत आहेत, पादचाऱ्याच्यांसह आणि वाहनचालकांना अतिशय त्रास गेले ०२ वर्ष सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत, याबाबत आपल्याकडे वेळोवेळी कळवून देखील आपण दखल घेत नाही, त्यामुळे दरम्यानच्या काळात आणि यापुढे या मार्गावर कोणताही अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जवाबदर कोण, एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यास त्याला जबाबदार कोण ? कारण मुख्य राष्ट्रिय महामर्गापासून उत्तोत्तम मार्ग कामगर आणि औद्योगिक वसाहतीत ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे? Road condition in Kherdi industrial estate
या निवेदनाचे निरसन आपल्या विभागाने न केल्यास दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी पासून आपल्या खेर्डी कार्यालयासमोर किंवा खडपोली येथील औद्योगिक वसाहती मार्गालगत आमरण उपोषणाचा अवलंब करणार, असा इशारा अडरेकर यांनी दिला आहे. Road condition in Kherdi industrial estate