गुहागर, ता. 08 : शहरात सध्या रहदारीच्या रस्त्यातच मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेले असतात. मात्र यावर गुहागर नगरपंचायत कोणतीच उपायोजना करताना दिसत नाही आहे. त्यामुळे मोकाट जनावरे एक मोठी जटिल समस्या बनली आहे. Road accidents due to loose animals

गुहागर शहरात रहदारीच्या रस्त्यातच सध्या चार ते पाच मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणारे वाहनचालक तसेच पादचारी नागरिकांना यांना याचा मोठा अडथळा निर्माण होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही मोकाट जनावरे शेतामध्ये जाऊन भाजीपाला फुलझाडे खाऊन शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. तसेच मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघात होत आहेत. Road accidents due to loose animals

काही दिवसांपूर्वी गुहागर मधील नागरिकांनी गुहागर तहसीलदार व गुहागर नगरपंचायतीला निवेदन देऊन मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी व जनावरांचा बंदोबस्त करावा. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र या निवेदनाला संबंधित कार्यालयाने वाटण्याच्या अक्षदा या म्हणीप्रमाणे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. तरी या मोकाट जनावरांबाबतची समस्या लवकरच सोडविण्यात यावी. Road accidents due to loose animals
