महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत प्राप्त
गुहागर, ता. 07 : राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चिपळूणचा रिषभ जॉय रॉय याने तब्बल २ सिल्व्हर मेडल प्राप्त करून चिपळूण शहराचे नाव राज्य पातळीवर झळकावले आहे. यापूर्वी देखील त्याने मुंबई जिल्हा अंतर्गत स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले होते. Rishabha Roy of Chiplun won the silver medal

चिपळूण शहरातील बुरुमतळी रिषभ जॉय रॉयने येथील डीबीजे कॉलेज मध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षणासाठी मुंबई गाठले. परिश्रम आणि जिद्द कायम ठेवून रिषभने पॉवरलिफ्टिंगच्या स्पर्धा गाजवण्यास सुरुवात केली. गेल्याच वर्षी मुंबईमध्ये जिल्हा अंतर्गत पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये रिषभ रॉयने तब्बल २ गोल्ड मेडल प्राप्त केले होते. त्याचवेळी रिषभ राज्य स्पर्धा गाजवेल, असा विश्वास त्याच्या प्रशिक्षकांना व सहकाऱ्यांना होता. Rishabha Roy of Chiplun won the silver medal
फक्त शिक्षणच न घेता त्याने वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यामाध्यमातून त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. त्यात यश देखील प्राप्त केले होते. दरम्यान इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनने मुंबई अंधेरी येथे २९ एप्रिल रोजी राज्य स्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत चिपळूणच्या रिषभ रॉय याने सहभाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात तब्बल २ सिल्व्हर मेडल प्राप्त करून चिपळूणचे नाव राज्य पातळीवर झळकावले आहे. रिषभ रॉयने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. Rishabha Roy of Chiplun won the silver medal
