• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राईट टू एज्युकेशन प्रमाणे राईट टू वॉटरचे अधिकार मिळावेत

by Ganesh Dhanawade
April 25, 2023
in Guhagar
47 1
0
Right to water should be given rights like right to education

जल जीवन मिशन प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी प्रशांत राऊत

93
SHARES
265
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांचे प्रतिपादन

गुहागर, ता. 25 : “राईट टू एज्युकेशन” प्रमाणे “राईट टू वॉटर” चा अधिकार देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचे सुयोग्य वाटप, गुणवत्ता पाण्याची उपलब्धता व पाण्याचे शुध्दीकरण महत्त्वाचे, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत यांनी केले. गुहागर पंचायत समिती येथे नुकतेच जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत सतरांवरील विविध भागधारकांचा योजनेच्या नियोजन, अंमलंबजावणी व देखभाल – दुरूस्ती टप्प्यावर सहभाग वाढवा, तसेच गावस्तरावर पाण्याचे सुयोग्य नियोजन व्हावे, यासाठी सदरच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. Right to water should be given rights like right to education

यावेळी सरपंच, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक व ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती सदस्य उपस्थित होते. याना प्रशिक्षणासाठी पाचारण करणेत आले होते. या प्रशिक्षणमध्ये योजनाची देखभाल – दुरूस्ती व हस्तारंण प्रक्रिया, पाईपचे प्रकार व फिटींग, पाण्याची सुरक्षितता व शाश्वतता, ग्रामिण पाणी पुरवठा समितीच्या जबाबदारी व कर्तव्य, पाणी गुणवत्ता व त्यांचे महत्त्व विविध तपासणी व त्यांचे प्रात्यक्षिक, पंपाचे प्रकार व प्रतिबंधात्मक उपाय-योजना इ. विषय तज्ञ मार्गदर्शकानी घेतले. सदरच्या प्रशिक्षणाची सुरवात पंचायत समिती गुहागरचे गट विकास अधिकारी श्री. प्रशांत राऊत यांनी प्रशिक्षणार्थीना जल प्रतिज्ञेनेची शपथ देवून व छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. Right to water should be given rights like right to education

श्री. राऊत पुढे म्हणाले की, काही कालांतराणे केवळ ५०% पाणी मिळणार असून आपण इंधनाला पर्याय शोधला. तथापी पाण्याला पर्याय नाही. असे सांगून पाण्याची उपलब्धता, गुणवत्ता व शुध्दीकरण यांसाठी सर्वानी गाव स्तरावरील समित्या सक्षम कराव्यात तसेच राईट टू एज्युकेशन प्रमाणे राईट टू वॉटरचे अधिकार देणेचे प्रतिपादन केले. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपञ देवून सांगता करणेत आली. या कार्यक्रमाला उपअभियंता श्री. छत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते. Right to water should be given rights like right to education

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRight to water should be given rights like right to educationUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.