रत्नागिरी, ता. 27 : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २५ ते २९ या कालावधीत होणाऱ्या ४३ व्या कुमार आणि मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार आणि मुली संघ रविवारी विमानाने रवाना झाला. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खो-खो पट्टू रिध्दी चव्हाणचा समावेश आहे. राज्य स्पर्धेत केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर तिची महाराष्ट्र संघात वर्णी लागली आहे. महाराष्ट्र संघ या राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. Riddhi Chavan of Ratnagiri in Kho-Kho competition
उत्तरप्रदेश अलीगड येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडीयममध्ये या स्पर्धा होणार आहेत. धाराशिवचे भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे यांची अनुक्रमे कुमार आणि मुली संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंना विमानाने प्रवासाची सुविधा दिली असून त्यासाठी राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष नियोजन केले आहे. Riddhi Chavan of Ratnagiri in Kho-Kho competition
ओम साईश्वर सेवा मंडळ, लालबाग येथे मुंबईत १७ नोव्हेंबरपासून प्रशिक्षण शिबिर झाले. या वेळी मंडळाचे श्रीकांत गायकवाड, नंदिनी धुमाळ, राजेश मोरे अस्मिता गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले आणि खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी जिल्ह्याचे महाराष्ट्र संघात प्रतिनिधित्व करणाऱ्या रिध्दी चव्हाणची ही दुसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे. यापुर्वी तिची १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिला राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच माजी सचिव संदिप तावडे, विनोद मयेकर आणि सर्व खो-खो पदाधिकाऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. Riddhi Chavan of Ratnagiri in Kho-Kho competition
कुमार गट : भरतसिंग वसावे (कर्णधार), सोत्या वळवी, विलास वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे (धाराशिव), प्रज्वल बनसोडे, प्रेम दळवी, पार्थ देवकाते (सांगली), कृष्णा बनसोडे, शुभम चव्हाण (सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), चेतन गुंडगळ, भावेश माशिरे (पुणे), अनय वाल्हेकर (अहिल्यानगर), प्रतिक जगताप (सातारा), प्रशिक्षक: युवराज जाधव (सांगली), संघ व्यवस्थापक: आकाश लोखंडे (धाराशिव) Riddhi Chavan of Ratnagiri in Kho-Kho competition
मुली गट : अश्विनी शिंदे, तन्वी भोसले, सुहानी धोत्रे (कर्णधार), प्रणाली काळे (धाराशिव), सानिका चाफे, प्रतीक्षा बिराजदार, धनश्री तामखडे (सांगली), प्राजक्ता बनसोडे, स्नेहा लामकाने (सोलापूर), दीक्षा काटेकर, धनश्री कंक (ठाणे), सुषमा चौधरी (नाशिक), दिव्या गायकवाड (मुं. उपनगर), रिद्धी चव्हाण (रत्नागिरी), जोया शेख (जालना), प्रशिक्षक: श्रीकांत गायकवाड (मुंबई), संघ व्यवस्थापिका: सुप्रिया गाढवे (धाराशिव) Riddhi Chavan of Ratnagiri in Kho-Kho competition