स्थानिक वाहन ठेकेदारांचे पैसे अडविले
गुहागर , ता.05 : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पात वाहनांच्या ठेक्याचे तीन महिन्यांची रक्कम दिलेली नाही. यामुळे या वाहनांवरील चालकांचा चार महिने पगार झालेला नाही. कंपनीमधील आरजीपीपीएल कंपनीचे अधिकारी आणि कंपनी चालवणाऱ्या एनटीपीसीचे अधिकारी यांच्यातीत सुप्त संघर्ष या परिस्थितीला कारणीभूत असल्याची चर्चा कंपनीत सुरू आहे. RGPPL withholds contractor’s money
रत्नागिरी वीज प्रकल्पातील विविध आस्थापनांयधील अधिकार्यांसाठी १५ वाहने ठेकेदारी पद्धतीने घेण्यात आली आहेत. यामधील काही वाहने चौवीस तासांसाठी कंपनीत असतात. त्यामुळे चालकांची संख्या २४ आहे. हातावर पोट असलेल्या या चालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. या चालकांनी मागिल आठवड्यात एकत्र येत पगार न दिल्यास कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ठेकेदारांना दिला. मग ठेकेदारांची धावपळ सुरू झाली. त्यांनी वाहन ठेक्याची ४ महिन्यांपासून थकित रक्कम तसेच अनामत आदी अन्य देणी त्वरीत देण्याची विनंती केली. RGPPL withholds contractor’s money


यावेळी झालेल्या चर्चेनंतर एका ठेकेदाराने सांगितले की, या प्रकल्पात काही अधिकारी हे थेट आरजीपीपीएल कंपनीने व्यवस्थापन विभागात नियुक्त केले आहेत. तर त्या अधिकार्यांवर व्यवस्थापक पदांवरील अधिकारी एनटीपीसीचे आहेत. या दोघांमध्ये समन्वय नाही. तसेच सुप्त संघर्ष आहे. दोन्हीही कंपन्यांचे अधिकारी त्यांच्या कडे मंजुरीसाठी येणार्या फाईल तांत्रिक त्रुटी काढून अडकवून ठेवतात. आणि आपणच कसे बरोबर हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. त्यात मरण ठेकेदारांचे होते. कंपनीने करारानुसार आम्हाला वेषेवर देयके दिली तर आम्ही कामगारांचे पगार आदी देणी वेळेवर पूर्ण करू शकतो. या त्यांच्यामुळे स्थानिक कामगार मात्र पगरापासून वंचित आहे. RGPPL withholds contractor’s money


कोणतीही परिस्थिती आणि कोणीही अधिकारी असला तरी स्थानिकांवर अन्याय करणे हा आरजीपीपीएल अधिकार्यांना हक्कच वाटतो. म्हणूनच कंपनी आर्थिक संकटात सापडल्यावर पहिला बळी स्थानिकांचा घेतला जातो. आजपर्यंत दरवेळी खासगी सुरक्षारक्षक, घरेलु कामगार, वर्षानुवर्षे कंपनीच्या कार्यालयात काम करणारे या सर्वांवर वेगवेगळ्या निमित्ताने आरजीपीपीएल व्यवस्थापनाने अन्याय केला. तसेच ज्यावेळी कंपनीला फायदा झाला त्यावेळी स्थानिकांना खड्यासारखे बाजूला ठेवून आनंदोत्सव साजरा केला आहे. कंपनीच्या या सापत्न वागणुकीच्या स्वभावाला कोण आवर घालणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. RGPPL withholds contractor’s money