रत्नागिरी, ता. 13 : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणारी केंद्रे अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपाताविषयी नागरिकांनी माहिती कळवावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांनी केले आहे. Reward for information about illegal abortion


तरी अशा प्रकारचे कृत्य करताना आढळल्यास १८००-२३३-४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच १०४ या क्रमांकावर अथवा www.amchimulgimaha.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी. तक्रारीची खातरजमा होऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणाऱ्यास शासनाच्या बक्षीस योजनेअंर्तगत रु. 1 लाखापर्यंत बक्षीस देण्यात येईल. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तरी असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. Reward for information about illegal abortion