गुहागर ग्रामदेवतेचा २० रोजी होणार दिमाखदार सोहळा
गुहागर, ता. 16 : श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागर येथील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तरी दि. २० ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे. Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

यानिमित्त सोमवार दि. २० रोजी दुपारी ३ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुहागर ते श्री भैरीव्याघ्रांबरी मंदीर पर्यंत ढोल ताशांचे गजरात नूतन पाषाण मुर्ती तसेच नवीन पालखीची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. मंगळवार दि. २१ रोजी सकाळी ७.३० वा. विधीयुक्त कार्यक्रमास सुरुवात, प्रधान संकल्प, अग्नी उत्तारण, जलाधिवास शैया आणि पिठ देवता स्थापना, बुधवार दि. २२ रोजी सकाळी ७.३० वा. विधीयुक्त कार्यक्रमास सुरुवात, पिठ देवता हवन, तत्वन्या होम, नुतन पुन: प्रतिष्ठा, षोडशोपचार पुजा त्याचबरोबर दुपारी १ ते 3 वा. अल्पोपहार, दुपारी ३ ते 6 वा. महिलांसाठी हळदीकुंकू, देवतांची पुनःप्रतिष्ठा झालेनंतर भक्तांना देवदर्शन व प्रसाद, सायं. ४ ते रात्रौ ९ वा. पर्यंत स्थानिक भजने होणार आहेत. Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागरचे अध्यक्ष शरद शेटे, खजिनदार मुरलीधर बागकर, सेक्रेटरी अरुण गुरव व सर्व कमिटी सदस्य व सर्व मानकरी, ग्रामस्थ यांनी केले आहे. Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri
