गुहागर पंचायत समिती कामाचा घेतला आढावा
गुहागर, ता. 28 : जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील चालू असलेल्या कामाबाबत आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत तालुक्यातील सरपंचांनी संबंधित ठेकेदार अनेक महिने गावात येत नसून ग्रामपंचायतीशी समन्वय साधत नसल्याने बहुतांशी कामे अर्धवट स्थितीत असल्याची कैफियत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडली. Review of Guhagar Panchayat Samiti work
तालुक्यातील बहुतांशी सरपंचांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अनेक कामे रखडल्याचा आरोप केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्यात काम करत असलेल्या सर्व कंत्राटदारांना उभे करून याबाबत समज दिली. तसेच इंजिनियर व ठेकेदार यांनी एकत्रित भेट देऊन ग्रामपंचायतींचे समन्वय साधावा, अशा सूचना मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्या. परचुरी – डाफळेवाडी, पिंपर, जानवळे आधी ठिकाणची कामे अर्धवट स्थितीत आपल्याला सांगण्यात आले. यावर संबंधित कंत्राटदाराने 30 ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करतो असे सांगितले. Review of Guhagar Panchayat Samiti work
![Review of Guhagar Panchayat Samiti work](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/06/add-2-300x202.jpg)
![Review of Guhagar Panchayat Samiti work](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/06/add-2-300x202.jpg)
मुंढर खुर्द येथे नव्याने बांधलेल्या टाकीला गळती होती. याची डागडुजी केल्यानंतर पुन्हा गळती कायम असल्याने टाकीचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली. यावर ही गंभीर बाब असून काम दर्जेदार नसेल तर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशार दिला. वरवेली येथील योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून काम करणाऱ्यांना साहित्य मिळत नाही. तसेच किरकोळ कामांसाठी काम अपूर्ण आहे कंत्राटदाराच्या असहकार्यामुळे वरवेली गाव हरघर जल घोषित होण्याचे राहिल्याचा आरोप करत पुढे अशीच स्थिती राहिल्यास ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल असा सरपंच नारायण आग्रे यांनी भर सभेतच इशारा दिला. साखरी त्रिशूल मोहल्ला येते वर्षभरापूर्वी दीड किलोमीटर पाईपलाईन खोदल्यानंतर पुन्हा कंत्राटदाराने काम सुरू केले नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे सरपंच सचिन म्हस्कर यांनी सांगितले. दोडवली येथे अर्धवट स्थितीत विहीर खोदून सहा महिने कंत्राटदार बेपत्ता आहे. या विहीरीला संरक्षक कठडा नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. Review of Guhagar Panchayat Samiti work
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, बांधकाम विभाग उपअभियंता संजय सहनाके, प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, अभियंता मंदार छत्रे आदी उपस्थित होते. Review of Guhagar Panchayat Samiti work