चिपळूणचा पुढचा आमदार ठाकरे गट शिवसेनेचाच: आ. जाधव
रत्नागिरी, ता. 01 : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे यांनी चिपळूण विधानसभा मतदार संघातील केवळ चिपळूण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक बांदल हायस्कूल येथे शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलावली होती. Review meeting of Chiplun Assembly officials


महाविकास आघाडीमध्ये दोन वेळा पडलेल्या मोठया फुटीनंतर या बैठकीला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले होते. शे-दीडशे पदाधिकारी या बैठकीला अपेक्षित असताना भास्करराव जाधव आढावा घेणार आहेत, हे कानोकानी समजताच तालुक्यातून पाच-साडेपाचशेहून अधिक प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ शिवसैनिकांनी या बैठकीला गर्दी करून जणू मेळाव्याचे स्वरूप आणले. सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा चिपळूण-संगमेश्वर विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निश्चय यावेळी केला. तसेच आ. जाधव यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी व इंदिरा कॉंग्रेस या महाविकास आघाडीचाच आमदार या मतदार संघातून निवडून येईल, अशी खात्री व्यक्त केली. Review meeting of Chiplun Assembly officials


या बैठकीला जिल्हाप्रमुख श्री. सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख श्री. प्रतापराव शिंदे, युवासेना कोअर कमिटी सदस्य श्री. विक्रांत जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. बाळा कदम, तालुका समन्वयक श्री. सुधीर शिंदे, श्री. मंगेश शिंदे, तालुकाप्रमुख श्री. विनोद झगडे, संघटक श्री. राजू देवळेकर, माजी सभापती विलास पिटले, श्री. बळीरामदादा शिंदे, सौ. धनश्री शिंदे, अशोकराव नलावडे, महिला आघाडी तालुका संघटक सौ. मानसी भोसले, शहरप्रमुख श्री. उमेश सकपाळ, युवा सेना तालुकाप्रमुख श्री. उमेश खताते यांच्यासह आजी-माजी उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. Review meeting of Chiplun Assembly officials