• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हयात महसूल सप्ताह साजरा

by Manoj Bavdhankar
August 5, 2023
in Ratnagiri
58 1
0
Revenue week in the district
115
SHARES
328
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एक हात मदतीचा कार्यक्रमांतर्गत 13 लाख 8 हजार 540 अनुदान वाटप

रत्नागिरी, दि. 05 : जिल्हयात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने जिल्हयात 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा या कार्यक्रमांतर्गत जिल्हयात नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित नागरिकांना 13 लाख 8 हजार 540 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. Revenue week celebrated in distric

एक हात मदतीचा या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये 2 मयत, 3 जखमी यांना 8 लाख 5 हजार 400,  तर मोठे दुधाळ 4, लहान दुधाळ 2, ओढकाम करणारे 2 यांना 2 लाख रुपयांचा, तसेच जिल्ह्यात 1 पुर्णतः पडझाड झालेली कच्ची घरे 1, अंशतः पडझाड झालेली कच्ची घरे 26, पक्की घरे 30, गोठे 7 यांना 3 लाख 3 हजार 140 रुपये असे एकूण  13 लाख 8 हजार 540 रुपयांचे अनुदान  वाटप करण्यात आले. Revenue week celebrated in distric

तसेच खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचे विमा उतरविण्याकरिता देय असलेले विविध दाखले देण्याकरिता जिल्हयात विविध ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांमध्ये 4052 व्यक्तीची उपस्थिती राहून 1096 अर्ज प्राप्त झाले. या शिबीरांच्या माध्यमातून  1272 दाखले वितरीत करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 जनजागृतीचे जिल्हयात 62 शिबिरांचे आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये 2594 व्यक्तीने सहभाग घेतला. Revenue week celebrated in distric

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRevenue week celebrated in districtUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.