गुहागर, ता. 04 : तालुक्यातील अडूर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा अडूर नं.०१ या शाळेतील सन १९७८-७९ च्या इयत्ता पहिलीच्या वर्गाचे पहिले गेट-टुगेदर नुकतेच अतिशय उत्साहात पार पडले. तब्बल ४८ वर्षांनंतर एकमेकांशी पुन्हा संपर्क साधत हे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि भावनांनी भरलेला, आठवणींनी ओथंबलेला कार्यक्रम साजरा केला. Reunion of 1978-79 class at Adur
शाळेतील दिवस, वर्गातील खोडकर किस्से, शिक्षकांची शिस्त, अभ्यासाचे क्षण आणि बालपणीचा साधेपणा हे सगळं आठवत पुन्हा त्या शाळकरी वयात हरवलेले चेहरे हास्य आणि अश्रूंमध्ये दिसत होते. काहीजण तर ४८ वर्षांनंतर प्रथमच एकमेकांना भेटले. कार्यक्रमाची सुरुवात परेडने झाली. प्रत्येकाने आपला आयुष्याचा प्रवास, व्यवसाय, अनुभव सांगताना जुन्या आठवणी शेअर केल्या. काहींनी कविता, गाणी आणि किस्स्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी काही दिवंगत शिक्षक व वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाने पुन्हा एकदा त्या निरागस शाळकरी मैत्रीला नवसंजीवनी दिली गेली. Reunion of 1978-79 class at Adur


या गेट-टुगेदरसाठी अडूर गावच्या सरपंच सौ. शैलजा गुरव, उपसरपंच उमेश आरस, मुख्याध्यापिका सौ. गुरव मॅडम, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष प्रदीप झगडे व इतर सदस्य उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांमध्ये नारायण झगडे, अरुण पवार, दीपक साळवी, रमेश आंबेकर, महेंद्र झगडे, चंद्रशेखर निंबरे, परेश पटेल, सुरेश देवळे, उदय माटल, विद्याधर जाधव, उदय कानडे, भारती झिंबर, कुंदा शिंदे, सविता पाटील, वंदना माटल, लीला घाणेकर, फिरोज मयेकर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. Reunion of 1978-79 class at Adur
जि. परिषद शाळा या ग्रामीण भारताच्या शिक्षणव्यवस्थेचा खरा पाया आहेत. या शाळांतून घडलेले माजी विद्यार्थी ही अमूल्य शिदोरी असून त्यांच्या सहभागाशिवाय शाळांचे सशक्तीकरण अपूर्ण आहे. माजी विद्यार्थी हे शाळेचे ब्रँड अॅूम्बेसेडर असतात. त्यांच्या यशोगाथा नव्या पिढीला प्रेरणा देतात व विद्यमान विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. अशा कार्यक्रमांमुळे गावातील सामाजिक ऐक्य वाढते. म्हणूनच माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर उपक्रम प्रोत्साहित करणे ही केवळ सामाजिक सौंदर्याची बाब नसून ती आजच्या काळाची गरज आहे. Reunion of 1978-79 class at Adur