गुहागरमध्ये घरोघरी तिरंगा अभियानांअंतर्गत स्पर्धांचे आयोजन
गुहागर, ता. 4 : श्री. देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय येथे घरोघरी तिरंगा अभियानांअंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल दि. 03/08/2022 रोजी जाहीर करण्यात आला. या स्पर्धा प्राथमिक गट( 1 ते 8 वी), व माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (9 ते 12 वी) अशा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. Results of the competition announced

प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत एकूण 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आश्विनी आनंदा दोलतडे, जामसूत हायस्कूल हिने प्रथम क्रमांक पटकावला. मृण्मयी दत्ताराम जाधव, पाटपन्हाळे हायस्कूल द्वितीय, तर ओम दिपक देवकर, गुहागर हायस्कूल तृतीय क्रमांक मिळवला आहे. Results of the competition announced
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत एकूण 17 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रगती पद्मनाथ जोशी, श्रीमती आर. पी.पी. विद्यालय पालशेत, हिने प्रथम क्रमांक पटकावला. तेजस्वी संतोष थोरसे, चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली, द्वितीय, तर अदिती अभिजित कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे तृतीय क्रमांक मिळवला आहे. Results of the competition announced

त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील रांगोळी स्पर्धेत एकूण 18 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आर्या योगेश साळवी, हिने प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा विनोद घाणेकर द्वितीय, तर चंदना विजय पडाळ यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. रांगोळी स्पर्धा केवळ माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी होती. परंतू प्राथमिक गटानेही छान, सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. रांगोळी स्पर्धेचे श्री. मेटकरी एस्. बी., श्री. कुळे एस्. बी., श्री. सुर्वे आर. जे. यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Results of the competition announced
