• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धांचा निकाल जाहीर

by Mayuresh Patnakar
September 16, 2022
in Ratnagiri
17 1
0
Result of district level drama competitions
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.16 : शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा व विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या होत्या. महोत्सवांमध्ये जिल्ह्यातून १४ नाट्य चमूनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचा निकाल घोषित करून, बक्षीस वितरण समारंभ मा. जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. Result of district level drama competitions

जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक लांजा येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालय हर्चे यांनी पटकावला आहे. द्वितीय क्रमांक चिपळूण एस .पी . एम . इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम यांनी तर तृतीय क्रमांक गुहागर र . पा .विद्यालय पालशेत तसेच उत्तेजनार्थ  १ महिला विद्यालय रत्नागिरी, उत्तेजनार्थ  २ हाजी  एस. एम. मुकादम हायस्कूल, खेड  या शाळांनी पटकावली आहेत. या जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या व सहभाग घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. Result of district level drama competitions

हा कार्यक्रम उपशिक्षणाधिकारी गोपाल चौधरी, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, कोषाध्यक्ष मोहन के .पाटील एम .के .सी .एल .चे रत्नागिरी जिल्हाप्रमुख  संतोष कोलते या  सर्व परीक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे, शाळांचे मुख्याध्यापकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. Result of district level drama competitions

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarResult of district level drama competitionsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.