गुहागर, ता. 26 : ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा देणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेव वृध्दी मास योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रत्नागिरी जिल्हयातील एक अग्रगण्य व विश्वसनीय पतसंस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या या पतसंस्थेने दि. १ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीसाठी जाहिर केलेल्या ठेव वृध्दी मास योजनेला ठेवीदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून दिनांक २४ ऑगस्ट २०२३ पर्यत या ठेव योजनेअंतर्गत रू. ५ कोटी ६० लाख मुदत ठेवी जमा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली. Response to Samarth Bhandari Deposit Increase Mass Scheme
या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी तसेच महिला व १८ वर्षाखालील मुलांसाठी नियमित व्याजदरापेक्षा अनुक्रमे अर्धा टक्के व पाव टक्के जादा व्याजदर देण्यात येत आहे. संस्थेने सभासद ठेवीदारांसाठी वेळोवेळी नवीन व आकर्षक योजना जाहीर करुन त्यांचे ठेवीवर किफायतशीर व सर्वाधिक व्याजदर देण्याचा प्रयत्न केला असून ठेवीदारांचे ठेवीचे सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. त्याचबरोबर संस्थेमध्ये गृहतारण कर्ज, वाहनतारण कर्ज, सोनेतारण, जामिनतारण, कॅशक्रेडीट इत्यादी विविध प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्द असुन त्यासाठी कमीत कमी कागदपत्रे तसेच अल्प व्याजदरामध्ये सदरच्या कर्ज सुविधा देण्यात येत आहेत. Response to Samarth Bhandari Deposit Increase Mass Scheme
संस्थेच्या ठेव योजनेचा कालावधी दि. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यतच असल्याने जास्तीत जास्त ठेवीदारांनी संस्थेच्या या आकर्षक ठेवयोजनांचा लाभ घ्यावा. तसेच कर्ज योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी केले आहे. Response to Samarth Bhandari Deposit Increase Mass Scheme