तीन हजारांहून अधिक वारकरी सहभागी
रत्नागिरी, ता.12 : शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित पहिल्या पायी वारीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन हजारहून अधिक वारकऱ्यांनी या वारीत सहभाग घेतला. वारीमध्ये भगवे झेंडे फडकले. वारकऱ्यांनी भजने, आरत्या, हरीपाठ म्हटला. तसेच महिलांनी फुगड्या घालत उत्सव साजरा केला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या साऱ्या आबालवृद्ध वारकऱ्यांना विठूनामाचा गजर केला. Response to Pai Wari in Ratnagiri
हनुमान मंदीर (सडा), विठ्ठल मंदीर देवस्थान समिती यांच्यासमवेत शिवप्रतिष्ठान हिंदस्थान, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, बजरंग दल, राष्ट्रीय स्यंसेवक संघ, राष्ट्रीय सेवा समिती, हिंदू राष्ट्र सेना, जनजागृती संघ यांच्या पुढाकाराने वारीचे चोख नियोजन करण्यात आले. याकरिता चार बैठकाही झाल्या होत्या. या नियोजनामुळे आज विराट गर्दी पाहायला मिळाली. लायन्स क्लब, रोटरी क्लब, शिवरूद्र ढोल पथक, आम्ही फक्त शिवभक्त ग्रुप, विविध भजनी मंडळे, इस्कॉन, भंडारी समाज इतर सर्व ज्ञाती संस्था, महिला मंडळ, वकील संघटना, व्यापारी संघटना यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आणि यथायोग्य मदतही केली. Response to Pai Wari in Ratnagiri
विविध शाळांतील विद्यार्थीसुद्धा वारीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः महिला वारकऱ्यांची गर्दी जास्त प्रमाणात होती. या वारीत जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी सहभागी झाल्यामुळे त्यांच्या भक्तिरसाची अनुभूती याचिदेही याचीडोळा अनुभवता आली. एकत्रित असलेली हिंदु शक्ती आणि सामाजिक समतेचे दर्शन या वेळी घडले. वारीमध्ये पालखी, विठुरायाची प्रतिमा यासह भगवे ध्वज फडकत होते. Response to Pai Wari in Ratnagiri
या रत्नागिरीतल्या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहानापासून थोरांपर्यंत लोकांचा उत्साही सहभाग. कोण अभंग सांगतोय, कोणी गजर सांगतोय, टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या गजरात दंग झालेले आबालवृद्ध, स्त्रि पुरुष इतके दंग झालेले पाहून खरंच भरुन येत होतं. अगदी पोलिसही यातून सुटले नाहीत. पोलिसातला माणूसही भारावून जावून त्यानेही एक का होईना फुगडी घातलीच. सकाळी साडेसहा- सातच्या सुमारास मारुती मंदिर येथून टाळ मृदुंगाच्या साथीने आणि मुखाने विठुनामाचा गजर करत, भजने म्हणत वारी निघाली. पहिले वारकरी माळनाका येथील स्काय वॉकजवळ असताना शेवटचा वारकरी मारुती मंदिरपाशी होता. एवढ्या विराट संख्येने वारकरी यात सहभागी झाले होते. ९ वाजण्याच्या दरम्यान वारी विठ्ठल मंदिरात पोहोचली. येथे सर्व वारकऱ्यांचे स्वागत विठ्ठल मंदिर देवस्थानने केले. Response to Pai Wari in Ratnagiri
वारीचा विलक्षण अनुभव व प्रतिक्रिया
रत्नागिरीत वारी काढावी हा विचार मनात आला. दोनच दिवसात वल्लभ केनवडेकर आणि विराज ऑफिसमध्ये राम मंदिरचा फोटो द्यायला आले. त्यांना हा विचार बोलून दाखवला. त्यांना आवडला. लगेच कौस्तुभ सावंत यांना फोन केला. सुहास ठाकुरदेसाई, प्रशांत पाध्ये यांना बोलले. तयारी सुरू झाली. १६ जूनला पहिली बैठक घेतली. उल्हास शेवडे यांना फोन केला. एकेक संपर्क करत गेलो. राकेश नलावडे, चंद्रकांत राऊळ, श्री. आणि सौ. ताटके, श्री. जोशी, पहिल्या सभेपासून हजर होते. आज वारीचा विलक्षण अनुभव मिळाला. आनंद मिळाला. अनेकांशी ओळखी झाल्या. झटून काम करणारे वारकरी भक्त आपल्यातच दिसले. Response to Pai Wari in Ratnagiri
– अॅड. रुची महाजनी
आबालवृद्धांनी एकत्र येत वारी यशस्वी केली. भक्ती रसात न्हाऊन निघालेला हा समूह मारुती मंदिर ते प्रती पंढरपूर विठ्ठल मंदिरापर्यंत अगदी सहजतेने आला. याला केवळ आणि केवळ हिंदु संघटनांची व कार्यकर्त्यांच्या टीमने केलेले नियोजन आहे. अहाहा….. इतकी गर्दी इतकी भक्तीरसाने डबडबलेली माणसं आणि केवळ पांडुरंगाच्या प्रेमासाठी एकत्र आलेला हा जनसमुदाय समाजाला एक शिकवण देऊन गेला. पुढील वर्षी जास्त ताकदीने वारी करू. Response to Pai Wari in Ratnagiri
– उल्हास शेवडे
अॅड. रुची महाजनी यांनी त्यांच्या मनातील वारीची संकल्पना मांडली. ती सर्व स्तरातील लोकांनी डोक्यावर घेतली काय.. आहाहा.. खरंच लय भारी… महिनाभर आपण सर्वांनी नियोजन केले, कोणी कोणी येईल ती जबाबदारी स्वीकारली, कोणी आर्थिक सहभागी झाले. कोणी प्रत्यक्ष कृतीत सहभागी झाले. ह्या सगळ्यांना आज खऱ्या अर्थाने वारीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मायमाउलींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आणखी ऊर्जा मिळाली. साक्षात रत्ननगरीत पंढरीच अवतरली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झालो. अशीच आपली शक्ती वाढत जावो. Response to Pai Wari in Ratnagiri
– कौस्तुभ सावंत
बारकाईने आजच्या वारीकडे जर आपण बघितलं तर आपल्या अस लक्षात येईल की हजारोंच्या संख्येने रत्नागिरीकर मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने सहभागी झाले होते. विठ्ठल नामाचा गजर, राम कृष्ण हरी, सुंदर असे विठूरायाचे अभंग, महिलावर्गाचा मनापासून सहभाग, त्यांनी घातलेल्या फुगड्या, ईस्कॉन संस्थेचे भजनी मंडळ आणि भजनाच्या तालावर त्यांचे भक्तिमय करतील असे नाच. आज खऱ्या अर्थाने रत्नागिरीत हिंदुत्व दिसून आले. Response to Pai Wari in Ratnagiri
– ओंकार फडके
विठू नामाच्या गजरात भक्तीभावाने तल्लीन झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहर-यावर आषाढी वारीचा उत्साह आज ओसंडून वाहत होता. पंढरीची वारी म्हणजे प्रत्येक हिंदुंच्या श्रध्देचा विषय. अशीच ठिकठिकाणी निघणारी आषाढी वारी धर्मरक्षणासाठी पूरक ठरेल आणि भविष्यात नक्कीच हिंदुराष्ट्राकडे वाटचाल करेल. ही वारी हिंदुंना एकात्मतेचा संदेश देणारी, ही वारी हिंदुंचा सांस्कृतिक वारसा जोपासणारी, ही वारी हिंदुंना अध्यात्माची शिकवण देणारी, प्रत्येक वर्षी अधिका अधिक संख्येने अशी वारी रत्नागिरी शहरात प्रतिवर्षी निघावी. व त्यातुन सकल हिंदु समाज एकसंघ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहुया. Response to Pai Wari in Ratnagiri
– अमित काटे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान.
एकतरी ओवी अनुभवावी या धर्तीवर एकतरी वारी अनुभवावी. अगदी खरं आहे ते, मी आज स्वतः अनुभवलं. भजन करत, नाचत, फेर धरत, प्रसंगी उड्या मारत, विठुनामाचा गजर करत आपण किती चाललो ते लक्षातच येत नाही. अक्षरशः धमाल केली आम्ही बापलेकांनी. अनेक दिवस पुणे ते सासवड वारीत जायचं मनात आहे. पण अजूनही घडलेलं नाही, म्हणून या रत्नागिरीतल्या वारीत सहभाग नक्की केला. पांडुरगाच्या नामात वारकरी का ? व कसे रमुन जात असतील याची पूर्ण कल्पना आली. तसेच झलकही पाहिली. एकूणच खूप छान अनुभव. पुनःपुन्हा घेण्यासारखा (आणि नक्कीच घेणार). महत्त्वाचे म्हणजे या दिंडीत समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग होता. पण येथे सर्वजण एकोप्याने सहभागी झालेले होते. येथे कोणी डॉक्टर, वकील किंवा आणखी कोणीही नव्हता, कोणीही उच्चाधिकारी किंवा राजकारणी. येथे सर्वजण एकाच पातळीवर होते. एकाच्या सुराला दुसरा ताल देत होता, दाद देत होता. Response to Pai Wari in Ratnagiri
-आनंद लिमये, कर्ले, रत्नागिरी.