रत्नागिरी, ता. 15 : भारतीय जनता पार्टीच्या नमो संवाद सभांना खेडशी येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शंकर पार्वती सभागृहात पहिली सभा घेण्यात आली. या सभेला चांगला प्रतिसाद लाभला. भाजपच्या संवाद सभांमधून मतदारांशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील योजनांची माहिती दिली जात आहे. आजची सभा लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. Response to Namo dialogue meetings
या वेळी रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, प्रदेश सदस्य अॅड. बाबा परुळेकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, तालुकाध्यक्ष दादा दळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संकेत कदम व अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रवींद्र इनामदार, कीर्ती मोडक आदी मतदारांनी मनोगत व्यक्त करून मोदी सरकारची स्तुती केली. Response to Namo dialogue meetings
या वेळी बाळ माने यांनी अबकी बार ४०० पार, वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या व सभेतील सर्व मतदार, कार्यकर्त्यांनीही घोषणा देऊन वातावरण भारून टाकले. श्री. माने म्हणाले की, लवकरच उमेदवार जाहीर होणार आहे. जास्तीत जास्त मतदान या निवडणुकीत होण्यासाठी आपण स्वतः मतदान करावे व शेजारी, नातेवाईक या सर्वांना मतदानासाठी पाठवावे, असे सांगितले. पंतप्रधानांनी आपल्याला विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. Response to Namo dialogue meetings
मार्गदर्शन करताना अॅड. पटवर्धन यांनी आजच्या पहिल्याच सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. केंद्रातील भाजपा सरकाराने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिब, तळागाळातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्याने देशभरातील कोट्यवधी जनतेला दिलासा मिळाल्याचे सांगितले. या निवडणुकीत कमळाच्या निशाणीवरील महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रास्ताविक करताना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील वातावरण भाजपमय असून पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी विराजमान होतील, असे सांगितले. सुजाता साळवी, अॅड. परुळेकर यांनीही मार्गदर्शन केले. Response to Namo dialogue meetings